new movie of kartik aaryan dhamaka teaser out on social media news anchor in movie  
मनोरंजन

धमाकाचा टीझर आऊट; कार्तिकनं केला धूर,अवघ्या दहा दिवसांत झाले शुटिंग 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्यार का पंचनामा भाग 1 आणि 2 मध्ये आपल्या अभिनयानं कार्तिक आर्यननं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतरही तो सोनू की टिटू की स्वीटीमध्ये दिसला होता. त्यात त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतूक केले होते. आता त्याचा एक नवीन सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावरही त्याच्या टीझरनं धुमाकुळ घातला आहे. कार्तिकच्या फॅन्सनं त्याच्या या टीझरला हजारोच्या संख्येनं लाईक्सची भेट दिली आहे. सध्या ट्रेडिंगचा विषय आहे. कार्तिक एका नव्या लुकमधून आपल्या समोर येणार असून त्याची उत्सुकता सर्वांना आहे.

आतापर्यत रोमँटिक अभिनेता म्हणून कार्तिकची प्रतिमा झाली होती. धमाका चित्रपटाच्या माध्यमातून त्याची इमेज बदलणार आहे. कारण आता तो थ्रिलर चित्रपटात काम करणार आहे. त्या चित्रपटाचा टीझर सध्या कमालीचा लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर तो गेल्या काही वेळापासून ट्रेडिंगचा विषय आहे. या चित्रपटात कार्तिक हा एका न्युज अँकरची भूमिका करत आहे. टीझरमध्ये कार्तिकच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंद केले आहे. त्याच्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेचे कौतूक होताना दिसत आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, न्यूजरुममध्ये बसून कुणावर तरी ओरडत आहे. आणि सांगतो आहे की, बंद करा हा कॅमेरा. आता माझ्याकडून हा शो काही होणार नाही.

त्यानंतर पुन्हा तो सांगतो की, मी अर्जुन पाठक आहे. आणि 24/7 चँनेलच्या माध्यमातून मी जे काही सांगेल ते खरे सांगेल पाहा हा व्हिडिओ.  कार्तिकनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा टीझर व्हायरल केला आहे. त्यानं इंस्टावरही तो शेअर केला आहे. त्यानं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, मी आहे अर्जून पाठक मी जे काही सांगेल ते खरे सांगेल, लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे. 

निर्मात्यांनी हा चित्रपट येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये सांगितल्या गेलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले की, केवळ दहा दिवसांत या चित्रपटाची शुटिंग पूर्ण करण्यात आली आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT