New Serial : भोसले - जमदाडे पुन्हा घेणार गुन्ह्याचा शोध, नवी मालिका लवकरच SAKAL
मनोरंजन

New Serial : भोसले - जमदाडे पुन्हा घेणार गुन्ह्याचा शोध, नवी मालिका लवकरच

गुन्ह्याला माफी नाही असं म्हणत सोनी मराठीवर नवी मालिका सूरु होतेय.

Devendra Jadhav

गुन्ह्याला माफी नाही असं म्हणत सोनी मराठीवर नवी मालिका सूरु होतेय. नुकताच या मालिकेचा टिझर प्रेक्षकांसमोर आलाय. या टिझर मध्ये अभिनेता हरीश दुधाडे पिस्तूल रोखून उभा आहे. त्यामुळे सोनी मराठीवर सुरु झालेली नवी मालिका रंगतदार असणार यात शंका नाही. याशिवाय तुमची मुलगी काय करते मालिकेतून लोकप्रिय झालेले इन्स्पेक्टर भोसले आणि PSI जमदाडे पुन्हा एकदा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

तुमची मुलगी काय करते या रहस्यमयी थ्रिलर मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. किल्वर कोण याचं रहस्य मालिकेच्या शेवटच्या भागात उलगडलं. सुरुवातीपासून या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अभिनेत्री मनवा नाईकने या मालिकेची निर्मिती केलेली. याच मालिकेच्या माध्यमातून इन्स्पेक्टर भोसले आणि PSI जमदाडे या दोन व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या.

याच दोन व्यक्तिरेखा सोनी मराठीवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री मनवा नाईक पुन्हा एकदा मालिकेच्या निमित्ताने निर्माती म्हणून धुरा सांभाळणार आहे. चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा या नव्या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी सांभाळणार आहे. या मालिकेची रिलीज डेट अजून समोर आली नाहीये.

प्रेक्षकांनी नव्या मालिकेच्या टीझरखाली कमेंट केल्या आहेत. अनेकांना हि नवी मालिका तुमची मुलगी काय करते मालिकेचा पुढचा सिझन वाटतेय. याशिवाय अनेक प्रेक्षकांनी भोसले - जमदाडे पुन्हा नव्या मालिकेतून भेटीला येणार असल्याने आनंद आणि उत्सुकता दाखवली आहे. पुढच्या काहीच दिवसांमध्ये या मालिकेविषयी सविस्तर माहिती स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव; सूर्य थेट डोक्यावर आल्याने काही क्षण सावलीच गायब

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT