new twist in nava gadi nava rajya marathi serial on zee marathi anandi reveal truth of varsha  sakal
मनोरंजन

Marathi Serial: 'नवा गडी' मालिकेत मोठा ट्विस्ट! वर्षाचं सत्य उघड करणार आनंदी..

'झी मराठी'वरील 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत दिसणार आनंदीचं नवं रुप..

नीलेश अडसूळ

nava gadi nava rajya : झी मराठी वरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतं आहे. अल्पवधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं. आनंदी, राघव, रमा, चिंगी आणि राघवची आई ही पात्र अगदी घरातल्यासारखी होऊन गेली आहेत. एखादा कौटुंबिक नाजूक विषय इतक्या छान पद्धतीने कसा हाताळला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

(new twist in nava gadi nava rajya marathi serial on zee marathi anandi reveal truth of varsha )

 या मालिकेतून अत्यंत वेगळा विषय हाताळता जात आहे. एका लग्न झालेल्या, ज्याला एक लहान मुलगी आहे, ज्याची बायको नुकतीच देवाघरी गेली आहे अशा पुरुषाशी लग्न करणाऱ्या गोड, निरागस तरुणीची म्हणजेच आनंदीची ही कथा आहे. आजवर सावत्र आई म्हणजे वाईट बाई ही चौकट देखील या मालिकेने मोडून काढली. शिवाय रोज नवा विचार, नात्यांची नवी ओळख ही मालिका करून देत आहे.

कर्णिकांच्या घरी रोज सकाळी येणारी राघवची बहीण वर्षा काही दिवस घरी न आल्यामुळे आनंदी चिंतेत आहे. वर्षा वारंवार आनंदीवर जाच करूनही आनंदिला मला तिची काळजी आहे. वर्षाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय याची आनंदीला कुणकुण लागलेय. म्हणून आनंदी, रमाच्या मदतीने समजून घेण्यासाठी पहिल्यांदाच वर्षाच्या घरी जाते आणि तिथे वर्षाला न भेटता तिच्या नवऱ्यासोबत तिची भेट होते, या भेटीनंतर वर्षाच्या आयुष्यात नक्की काहीतरी गडबड आहे हे आनंदीला कळतं.

आनंदी ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते पण कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. एकीकडे आनंदीमुळे राघवच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असताना वर्षाचं सत्य घरातल्यांसमोर कसं आणणार आनंदी ही पाहणे रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे सत्य समोर आल्यानंतर आनंदीची भावनिक साद आणि रमाची सुपर पावर वर्षाला तिच्या जाचातून कसं मुक्त करतील  हे पाहणं अधिक औत्सुक्याचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : जळगावात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जन्य साठ्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT