Miss Universe 2023:  
मनोरंजन

Miss Universe 2023: भारताचं स्वप्न भंगलं! निकारागुआची Sheynnis Palacios नं जिंकला मिस युनिव्हर्स 2023 चा ताज

निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस हिला मिस युनिव्हर्स 2023 चे विजेते घोषित करण्यात आले आहे.

Vaishali Patil

यंदा 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे पार पडली. मिस युनिव्हर्स स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. यात निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस हिला मिस युनिव्हर्स 2023 चे विजेती घोषित करण्यात आले आहे.

तिला मिस युनिव्हर्स 2022 - USA च्या R'Bonney Gabriel ने मुकुट घातला. या स्पर्धत ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन ही दुसरी उपविजेती ठरली तर थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ही सौंदर्य स्पर्धेत प्रथम उपविजेती ठरली.

या स्पर्धेचे आयोजन Jeannie Mai आणि Maria Menounos आणि माजी मिस युनिव्हर्स Olivia Culpo यांनी केले होते. यंदा सुमारे 84 स्पर्धक मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होते. यात सेमीफायनलसाठी 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे ज्यात भारताच्या श्वेता शारदाचाही समावेश होता.


यावेळी शेवटच्या टप्पात स्पर्धकांना विचारण्यात आले होते की त्यांना कोणत्या महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायचे आहे आणि का?

मिस ऑस्ट्रेलियाने तिच्या आईचे नाव घेतले तर मिस थायलंडने मलाला युसूफझाईचे नाव सांगितले. तिने सांगितले की तिचा संघर्ष आणि यश तिला खूप प्रेरणा देते.

मिस निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसचे उत्तर सर्वात वेगळे आणि अनपेक्षित होते. तिने मैरी वोलस्टोनक्राफ्टच्या नावाचा उल्लेख केला ज्या महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जातात. याच उत्तराने तिला मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती केले.

यावर्षी चंदीगडच्या श्वेता शारदाने मिस युनिव्हर्स 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप 20 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले. यावर्षी पाकिस्ताननेही पहिल्यांदा मिस युनिव्हर्समध्ये पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT