Nimrit Kaur Ahuluwalia abuse priyanka chahar choudhary in big boss 16
Nimrit Kaur Ahuluwalia abuse priyanka chahar choudhary in big boss 16  Google
मनोरंजन

Big Boss 16: शिवीगाळच नाही,मारामारीपर्यंत पोहोचलं प्रियंका-निम्रत कौरचं भांडण; व्हिडीओ जोरदार व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Big Boss 16: 'बिग बॉस १६' सुरुवातीच्या दिवसांपासून प्रियंका आणि निम्रत मध्ये छत्तीसचा आकडा दिसून आला आहे. या दोघींमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरुनही टोकाचं भांडण होतं. यावेळी निम्रत आणि प्रियंकामध्ये साधं जेवणावरून भांडण झालेलं दिसून आलं. यावर ट्विटरवर बिग बॉस विरोधात संतापाचा भडका उडाला.(Nimrit Kaur Ahuluwalia abuse priyanka chahar choudhary in big boss 16)

निम्रत कौर अहलुवालिया ही बिग बॉसच्या घरातील सर्वात मजबूत स्पर्धक मानली जाते. सुरुवातीच्या आठवड्यात जेव्हा ती कॅप्टन बनली तेव्हा प्रत्येकजण तिच्याकडून सत्यासाठी आणि सर्वांसाठी उभे राहण्याची अपेक्षा करताना दिसला. मात्र ती या कॅप्टनशीप पासून दूर गेल्यापासून तिची सातत्याने चर्चा होत आहे. तिचे घरातल्यांचे प्रियंकासोबतचे वैर सर्वांनाच ठाऊक आहे, मात्र आता हे भांडण असे झाले आहे की निम्रतला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे

झाले असे की, प्रियंका अंकितशी बोलताना निम्रतशी बोलणं टाळते. याचे निम्रतला वाईट वाटतं आणि ती त्याला अडवायला सुरुवात करते. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. निम्रतने प्रियंकाला शिवीगाळही केली. प्रियंकाला मारण्याबाबत बोलताना निम्रतने शालीनला शिवीगाळ केली. रागात निम्रत म्हणाली- 'मी त्याला मारून टाकेन...' आणि अपशब्द बोलते. प्रोमोचा हा भाग पाहून यूजर्स निम्रतच्या विरोधात गेले आहेत.

घरातील दोन तगड्या स्पर्धकांना असे भांडताना पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली. निम्रतने प्रियंकाला अशाप्रकारे शिवीगाळ करणे कोणालाही आवडले नाही. प्रोमोजवर अनेकांनी संतापजनक कमेंट केल्या. युजर्सनी निम्रतला प्रचंड ट्रोल केले आहे. अनेकांनी निम्रतचे बिग बॉसचे जुने व्हिडिओही अपलोड केले आहेत. जिथे प्रियांका आणि अंकित जेवण करत आहेत आणि निम्रत गौतमशी त्यांच्या जेवणाबद्दल बोलत आहेत. एका यूजरने लिहिले - "ती हे स्वतः करते आणि इतरांना चिप म्हणते". अनेक यूजर्स "बिग बॉस आणि सलमान खान यांना टॅग करून हे भेदभाव करत असल्याचा आरोप करत आहेत" " हे असे धमकी देणे बिग बॉसच्या घरात चालते का? बिग बॉस का चुप आहे?" " निम्रतला बाहेर काढा "

आता वीकेंड का वार एपिसोडमध्ये काय होणार? बिग बॉस जनतेचा आवाज ऐकणार का? सलमान खान कोणाची क्लास घेणार? हे पाहणे खरोखर मनोरंजक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT