nirbhaya mother on sushant 
मनोरंजन

निर्भयाच्या आईचा सुशांतच्या कुटुंबियांना पाठिंबा, म्हणाल्या 'धीर सोडू नका कारण...'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतचं कुटुंब  त्यांच्या मुलाला न्याय मिळावा यासाठी कायदेशीर लढाई करत आहेत. सुशांतच पूर्ण कुटुंब सुशांत मृत्यु प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय तपासाची मागणी करत आहेत. त्यांनी लोकांना जास्तीत जास्त संख्येने सुशांतसाठी सीबीआयची मागणी करावी असं देखील म्हटलं आहे. चाहत्यांसोबतंच अनेक सेलिब्रिटी त्यांना यासाठी पाठिंबा देत आहेत यात आता निर्भयाच्या आईने देखील सुशांतच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शवला आहे.

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना निर्भयाची आई आशा देवी यांनी सुशांतच्या कुटुंबियांना पाठिंबा दिला आहे. निर्भयाच्या आईने सांगितलं की 'सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ज्या प्रकारे आपल्या भावासाठी न्यायाची मागणी करत आहे ते पाहून त्यांना खूप दुःख झालं आहे. त्यांना श्वेता सिंहला आश्वासन देत म्हटलं आहे की तिने विश्वास ठेवावा, सत्य नक्कीच समोर येईल आणि न्याय मिळेल. इतकंच नाही निर्भयाची आई आशा देवी यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.'

आशा देवी यांनी सुशांतच्या वडिलांना मेसेज देत म्हटलं आहे, की त्यांनी 'धीर सोडू नये. सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवावा. संपूर्ण देश तुमच्या मुलासोबत आहे आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.' सुशांतच्या मृत्युला आज दोन महिने पूर्ण झाले मात्र अद्यापही ही आत्महत्या आहे की हत्या हे तपासात कळू शकलेलं नाही. 

सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंह हिने सोशल मिडियावर भावूक व्हिडिओ शेअर करत लोकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी तिच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय तपासाची मागणी करावी. श्वेताने पहिल्यांदा व्हिडिओ शेअर करत ही मागणी केली होती.   

nirbhaya mother asha devi comes in support of sushant singh rajput family  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT