Nishigandha Wad
Nishigandha Wad  
मनोरंजन

'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत निशिगंधा वाड साकारणार जिजामाता

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवर २६ जुलैपासून सुरु होणाऱ्या जय भवानी जय शिवाजी Jai Bhavani Jai Shivaji मालिकेत जिजाऊंची भूमिका कोण साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड Nishigandha Wad साकारणार आहेत. निशिगंधा वाड या इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अशी पालनकृत, ताठ कण्याची, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे असं निशिगंधा वाड म्हणाल्या. (Nishigandha Wad to play Rajmata Jijau in Jai Bhavani Jai Shivaji slv92)

जवळपास १० वर्षांनंतर निशिगंधा मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. या दमदार कमबॅकसाठी त्या खूपच उत्सुक आहेत. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना निशिगंधा वाड म्हणाल्या, "हे पात्र साकारताना आणि जिजाऊंच्या रुपात उभं करण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आहेत. अगदी लेखकापासून, दिग्दर्शक, मेकअपमनपासून प्रत्येकाची मेहनत आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक आलेलं हे पात्र साकारताना मी कुठेही कमी पडू नये यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. जय भवानी जय शिवाजी ही मालिका स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम आहे. छत्रपती शिवरायांसाठी समर्पण दिलेल्या शिलेदारांची गोष्ट मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी देखिल या महत्त्वाकांक्षी मालिकेचा अंश आहे."

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. या भव्यदिव्य मालिकेतून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण प्रधान, नेताजी पालकरांच्या भूमिकेत कश्पय परुळेकर आणि शिवा काशिदच्या भूमिकेत विशाल निकम अशी दमदार कलाकारांची फौज या प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT