Nita Ambani Cultural Centre Salman Khan Aishwarya  esakal
मनोरंजन

NMACC : सलमान-ऐश्वर्या पुन्हा आमनेसामने? अंबानींच्या कल्चर सोहळ्यात...!

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सुरु केलेल्या कल्चरल सेंटरची आता साऱ्या देशभर चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nita Ambani Cultural Centre Salman Khan Aishwarya Rai : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सुरु केलेल्या कल्चरल सेंटरची आता साऱ्या देशभर चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडचे देखील काही सेलिब्रेटी सहभागी झाले होते. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सोहळा चर्चेत आला आहे.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय यांची चर्चा नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असते. अजुनही त्यांच्यातील काही गोष्टींना सोशल मीडियावर मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून चाहत्यांची होणारी चर्चा याची क्रेझ काही वेगळीच आहे. काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत सहभागी झाली होती.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

ऐश्वर्या आणि सलमान हे नेहमीच पापाराझ्झी आणि चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय राहिले आहे. नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घघाटन सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक दिग्ग्ज सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यामध्ये सलमान आणि ऐश्वर्याच्या इंट्रीना साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटरकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. एका नेटकऱ्यानं तर पुन्हा तिच सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक जोडी पाहून आनंद झाला. असे म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घघाटनचा सोहळा सुरु आहे. त्याचे ग्रँड सेलिब्रेशन केले जात आहे. अशावेळी बॉलीवूडच्या पाहुण्यांची हजेरी चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आतापर्यत या सोहळ्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, ऋतिक रोशन, न्यासा देवगण, काजोल, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, वरुण धवन, शाहिद कपूर, रश्मिका मंदाना, यासारखे दिग्गज सहभागी झाले होते.

मात्र यासगळयात चर्चा रंगली होती ती ऐश्वर्या आणि सलमानच्या फोटोंची, त्या दोघांनाही सोहळ्यामध्ये पापाराझ्झींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केल्याचे दिसून आले असून फोटोंना चाहत्यांनी कमेंट देत सलमान - ऐश्वर्याचे कौतूकही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT