Nitesh Rane Comment On Sanjay Raut The Kerala Story esakal
मनोरंजन

The Kerala Story : संजय राऊतांना 'द केरळ स्टोरी' नाहीतर 'रशियन स्टोरी' आवडते! नितेश राणेंचं उत्तर

'द केरळ स्टोरी' नं आता मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वेगळ्याच विषयाला तोंड फुटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nitesh Rane Comment On Sanjay Raut The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' नं आता मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वेगळ्याच विषयाला तोंड फुटले आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या द केरळ स्टोरीवरुन मोठ्या वादाला देखील सुरुवात झाली आहे. त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटल्याचे दिसून येत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या चित्रपटावरुन कॉग्रेसला धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. देशामध्ये जे काही घडते आहे तेच या चित्रपटामध्ये दिग्दर्शकानं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असे सांगून मोदींनी द केरळ स्टोरीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर हा चित्रपट टॅक्स फ्री करावा. अशी मागणी केली गेली. मध्यप्रदेशामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता. आता तो महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी होत आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासगळ्यात भाजपचे नितेश राणे यांनी द केरळ स्टोरीचा संदर्भ घेत खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ती व्हायरल झाली आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींना उधाणही आले आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी द केरळ स्टोरी संदर्भात भाष्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे लोक असा चित्रपट काढतात आणि प्रपोगंडा चालवतात. हिंदू मुस्लिम राजकारण करतात. त्यावर राणेंनी राऊतांना जशास तसे उत्तर दिले आहे.

राणे म्हणाले, राऊत यांना लाज वाटली पाहीजे. त्यांना देखील एक मुलगी आहे. ते वडील आहेत. लव्ह जिहादमुळे असंख्य हिंदू मुलींचे आयुष्य उद्धवस्त केलं. त्यावर हा चित्रपट काढला आहे. आपल्या कोणाच्या घरात हा विषय झाला तर आपण असं बोललो नसतो. संजय राऊत यांनी केरला स्टोरी आवडत नाही तर त्यांना दिशा सालियन स्टोरे काढायची का ओटीटीवर, पेंग्विन ला घेऊन या बघायला. संजय राऊत यांना द रशीयन स्टोरी खूप आवडतात. रशीयन स्टोरी चित्रपटाची लिंक पाठवतो. असे नितेश राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT