nitin gadkari live updates prashant damle interview nagpur sakal coffee table event SAKAL
मनोरंजन

Nitin Gadkari: कोणता आघाडीचा गायक आवडतो? नितीन गडकरींनी घेतलं या हिंदी गायकाचं नाव

नितीन गडकरींनी या आघाडीच्या हिंदी गायकाचं नाव घेतलंय

Devendra Jadhav

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी विविध कार्यक्रमातून त्यांच्या विकास कामांविषयी व्यक्त होतच असतात. आज सकाळ आयोजित `मनातले गडकरी` या कार्यक्रमात नितीन गडकरी यांची अभिनेते प्रशांत दामलेंनी मुलाखत घेतली. त्यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांच्या गाणी आणि संगीताच्या आवडीबद्दल मनमोकळं केलं.

(who is nitin gadkari favourite singer)

प्रशांत दामलेंनी गडकरींना प्रश्न विचारला. त्यावेळी गडकरी बोलता बोलता गाणं गुणगुणतात याबद्दल प्रशांत दामलेंनी नितीन गडकरींना बोलतं केलं. तेव्हा गडकरी म्हणाले, "तुम्ही गायक आहात, तुम्ही गाणं चांगलं गुणगुणता. मी एकदा गाणं गुणगुणलं तेव्हा त्याची खुप चर्चा झाली. मला शैलेंद्र, नितीन मुकेश, हसरत जयपुरी असे सर्व आवडतात.

आता सध्या मी ओ मेरे सनम, ओ मेरे सनम हे लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं ऐकतोय. आता मोबाईलमुळे काम सोप्पं झालंय. त्यामुळे विमानात बसल्यावर मी कानात हेडफोन टाकून हे गाणं ऐकतो.

याशिवाय आघाडीच्या गायकाबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणतात, "माझ्या लिस्टमध्ये सगळे गायक आहेत. लता मंगेशकर, गुलाम अली, राहत फतेह अली खान आणि नव्या पिढीचा अरजित सिंग हे गायक मला आवडतात."

असं नितीन गडकरी म्हणाले. त्यामुळे नव्या पिढीचा गायक अरजित सिंग नितीन गडकरींचा फेव्हरेट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT