nitish chavan 
मनोरंजन

अभिनेत्री कमल ठोके यांच्या निधनानंतर ‘अज्या’ची भावनिक पोस्ट,  ''जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता गं तुला..''

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या जेष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं नुकतंच निधन झालं. गेल्या अनेक काळापासून त्या कर्करोगाने त्रस्त होत्या. बंगळुरूमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कमल ठोके यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.  त्या ७४ वर्षांच्या होत्या.

प्रसिद्ध मालिका 'लागिर झालं जी' मधून कमल ठोके यांनी जीजी हे पात्र साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे सहकलाकारांसोबतंच चाहत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. लागिरं झालं जी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणा-या अजिंक्य म्हणजे अभिनेता नितीश चव्हाणने त्याच्या लाडक्या जीजीसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.मालिकेत अज्या या मुख्य पात्राची ती आजी होती. त्यामुळे अज्याचं पात्र साकारणा-या नितीशच्या ती खूप जवळची होती. सेटवर त्या सगळ्यांच्याच लाडक्या होत्या.

नितीशने पोस्ट करत लिहिलं, “जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता ग तुला, मला काय बोललेलीस प्रत्येक ठिकाणी मीच तुझी आज्जी असणारे आणि तूच माझा नातू ,आपल्या दोघांना एकत्र खूप काम करायचं होतं ना मग का ग इतक्यात सोडून गेलीस,” अशा शब्दात अभिनेता नितीश चव्हाण याने त्याचं दु:ख व्यक्त केलंय.

नितीशसोबतच मालिकेत शीतलीचं पात्र साकारणा-या शिबानी बावकर हिने “जिजे, जिवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहिल गं, भावपुर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात कमल ठोके यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तर अभिनेता किरण गायकवाडने, “जिजे, छबुडे, कमळे, का? खुप मोठी पोकळी केलीस. RIP” असं म्हणत दुःख व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री कमल ठोके या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली पण त्यांचा ओढा अभिनयाच्या दिशेने होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच त्यांनी ‘बाबा लगीन’, ‘बरड’, ‘माहेरचा आहेर’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आम्ही असू लाडके’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. मात्र त्यांना घराघरात ओळख मिळाली ती या मालिकेतील जीजी या पात्रामुळे. त्यांच्या जाण्याने चाहत्यांमध्ये दुःखाच वातावरण आहे.  

nitish chavan lagira zala ji actor share emotional post for late actress kamal thoke  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: खरंच, सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन करणे टाळले? Viral Video ने समोर आलं सत्य...

Khamgaon News : व्यापारी गाळ्यातून नगर परिषदची ३.४४ कोटींची बक्कळ कमाई; १२ गाळ्यांचा झाला लिलाव

Mumbai Fire: आगीपेक्षा धूर ठरला घातक! दहिसर आग दुर्घटना; इमारतीतील व्हेंटिलेशन आउटलेट बंद

Crime: आई-बाबा, मी थकलोय... युट्यूबवर व्हिडिओ बनवला, नंतर वडिलांसमोर पोरानं गळा चिरून घेतला, कारण वाचून डोळे पाणावतील

Electric Bike Fire : मुंबई-बंगळुर महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला आग; दुचाकीस्वार महिला थोडक्यात बचावली, महामार्गावर ३ किलोमीटर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT