nivedita saraf and ashok saraf funny video of diwali 2023 goes viral on internet SAKAL
मनोरंजन

Nivedita - Ashok Saraf: दिवाळीच्या शुभेच्छा देताना अशोक सराफ यांनी केलं असं काही की निवेदिता खळखळून हसल्या, व्हिडीओ बघा

निवेदिता - अशोक सराफ यांचा मजेदार दिवाळी विशेष व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Nivedita - Ashok Saraf Video News: अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेता अशोक सराफ यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांचे अनेक धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या दोघांच्या व्हिडिओवर त्यांचे चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अशातच निवेदिता - अशोक यांचा दिवाळीनिमित्त एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत दोघेही दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. पण अशोकमामांनी असं काही केलंय की निवेदिता यांना हसू आवरल नाही. काय झालंय नेमकं बघा.

दिवाळीनिमित्त निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यात निवेदिता यांच्या समोर फराळाचं ताट दिसतंय. अशोक सराफ त्यांच्या शेजारीच बसले आहेत. निवेदिता एक - एक करून सर्व पदार्थांची ओळख करून देतात. पुढे अशोक सराफ त्यातली चकली उचलतात. "मी आता चकली खातोय. पण हळूहळू सर्व खाईल" असं अशोक सराफ म्हणतात. निवेदिता सुद्धा अशोक मामांना सर्व पदार्थ खाण्याची सुट देतात.

पुढे निवेदिता अशोक सराफ यांना ताटात असलेला विशेष दिवाळी पदार्थ देतात. अशोक सराफ तो खातात. मग निवेदिता म्हणतात "कसा झालाय तो सांग". अशोकमामा मस्त मस्त very good असं म्हणतात. व्हिडिओच्या शेवटी निवेदिता सराफ सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अशोक सराफ खाण्यात इतके मग्न असतात की ते काहीच बोलत नाहीत. मग निवेदिता त्यांना सांगतात, "अरे तू सुद्धा म्हण ना!" असं म्हणत त्या हसायला लागतात. आणि शेवटी निवेदिता सराफ सर्वांना हॅपी दिवाली म्हणतात.

निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं तर.. निवेदिता सध्या भाग्य दिले तू मला मालिकेत अभिनय करत आहेत. तर अशोक सराफ सध्या कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये झळकत नसून ते शेवटी या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा वेड मध्ये झळकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

INDW vs PAKW: भारताने केलेलं रनआऊट योग्यच! पाकिस्तानला क्रिकेटचा नियम सांगत MCC ने दाखवला आरसा

18 वर्षानंतर 'दामिनी' प्रेक्षकांच्या भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरला, निर्भिड पत्रकार पुन्हा समोर, सुबोध भावेची महत्त्वाची भूमिका

Manikrao Kokate : मला रम्मी खेळता येत नाही!”; मंत्री कोकाटे यांचा न्यायालयात दावा

माेठी बातमी! 'डीजेमुक्ती'नंतर आता 'भाेंगेमुक्त' साेलापूर; २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे, स्पीकर काढले..

SCROLL FOR NEXT