ashok and nivedita saraf 
मनोरंजन

"मी तर निंदकाशीच लग्न केलंय"; निवेदिता यांनी अशोक सराफांबद्दल असं का म्हटलं?

स्वाती वेमूल

अभिनेत्री निवेदिता सराफ आता एका नव्या 'आसावरी'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका आता 'अग्गंबाई सूनबाई' या नावाने प्रसारित होत असून त्यातील भूमिकांमध्येही बरेच बदल झाले आहेत. अत्यंत प्रेमळ आणि लाघवी असणारी आसावरी आता खाष्ट सासू झाली आहे. तिचा स्वत:चा व्यवसाय असून बबड्या त्यामध्ये पगारी नोकर म्हणून काम करतोय. या नव्या मालिकेतील भूमिकेविषयी निवेदिता या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने व्यक्त झाल्या. त्यांच्या अभिनयाबद्दल अशोक सराफ यांची काय प्रतिक्रिया असते हेसुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. "आजही भूमिका साकारताना माझ्या पोटात गोळा येतो", असं त्या म्हणाल्या. 

"जे तुम्ही नाही आहात, ते साकारण्यात फार मजा येते. या नव्या मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवलाय आणि त्यादरम्यान भूमिका बदलल्या आहेत. अशा विविध भूमिका साकारायला मिळतात, त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मी खूप समाधानी आहे. या बदललेल्या आसावरीसाठीही कुटुंब महत्त्वाचं आहे. फक्त हा कुटुंब तिच्या चार लोकांपुरता आता मर्यादित नाही. आता तिला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. ती थोडी कठोर झाली आहे. आसावरी बदलली असल्यामुळे शुभ्रासुद्धा आता तशीच राहिली नाही. आसावरीला तिला बदलायचं आहे. आशुतोषने बबड्याच्या भूमिकेला कुठच्या कुठे नेऊन ठेवला होता. तेजश्री प्रधानसोबत माझी खूप चांगली मैत्री झाली. ही मैत्री पुढेही तशीच कायम राहील", असं त्या 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. 

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी त्या पुढे म्हणाल्या, "मी ट्रोलिंगचा फार विचार करत नाही. आजकाल सोशल मीडियावर माणसं फार जजमेंटल झाली आहेत. या वयात मी पैशांसाठी काम करत नाहीये, तर एंजॉय करण्यासाठी काम करतेय. प्रत्येक भूमिका साकारताना मला थोडंसं टेन्शन असतंच. लोकं म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी, पण मी तर निंदकाशीच लग्न केलंय. रोज भेटल्यावर ते माझी कानउघडणी करतात आणि ते काय बोलतील या विचाराने माझ्या पोटात गोळा येतो. पण ते माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रियासुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे."

१५ मार्चपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये निवेदिता सराफ यांच्यासोबत गिरीश ओक, उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर मुख्य भूमिका साकारत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT