Nora Fatehi Latest News Nora Fatehi Latest News
मनोरंजन

Nora Fatehi : नोरा फतेहीची लावणी पाहून माधुरी दीक्षितने वाजवली शिट्टी

व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या चेहऱ्यावरील भाव अप्रतिम दिसत आहेत

सकाळ डिजिटल टीम

Nora Fatehi Latest News डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) झलक दिखला जा १० या डान्स रिॲलिटी शोला जज करीत आहे. नोरा फतेहीने चित्रपटसृष्टीत ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ती चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. झलक दिखला जा १० च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेहीचा डान्स पाहून माधुरी दीक्षितही (Madhuri Dixit) स्वतःला शिट्टी वाजवण्यापासून रोखू शकली नाही.

व्हिडिओमध्ये नोरा फतेही हिरव्या रंगाची नऊवारी साडी, सोनेरी नथ आणि हेवी वर्क ज्वेलरी परिधान केलेली दिसत आहे. अमृता खानविलकर लावणी डान्स नंबर सादर करून शोमध्ये परफॉर्म करणार आहे. माधुरीला लावणीची आवड आहे. अमृताचा परफॉर्मन्स संपल्यावर माधुरीने नोरा फतेहीला स्टेजवर अमृतासह लावणी नृत्य करण्याची विनंती केली. नोराने (Nora Fatehi) लावणी करून सर्वांची मने जिंकली.

व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या चेहऱ्यावरील भाव अप्रतिम दिसत आहेत. माधुरी दीक्षित देखील अभिनेत्रीच्या अभिनयाचा खूप आनंद घेताना दिसत आहे. नोरा फतेहीचा परफॉर्मन्स संपताच माधुरी दीक्षित जोरात शिट्ट्या वाजवते आणि आनंदाने तिला स्टँडिंग ओव्हेशन देते. नृत्य प्रकार कोणताही असो नोरा फतेही चांगले नृत्य करते.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नोरा फतेहीसोबत करण जोहर झलक दिखला जा १० ला जज करीत आहे. नोरा फतेहीच्या लावणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नोरा फतेही दिलबर या म्युझिक व्हिडिओमुळेच चर्चेत आली होती. या गाण्यानंतरच नोरा फतेहीची लोकप्रियता वाढली. झलक दिखला जा १० पाच वर्षांनंतर नव्या सीझनसह परतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT