Nora Fatehi Sukesh Chandrashekhar Money Laundering esakal
मनोरंजन

Nora Fatehi : 'नोरा फतेही हाजिर हो'! दिल्लीच्या पटियाला कोर्टात पोहचली

सुकेश चंद्रशेखरनं केलेल्या दोनशे कोटींच्या मनी लॉड्रींग प्रकरणात नोराचा देखील सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

युगंधर ताजणे

Nora Fatehi Sukesh Chandrashekhar Money Laundering : बॉलीवूडची प्रसिद्ध सेलिब्रेटी डान्सर नोरा फतेहीच्या डोकेदुखीत आणखी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीमुळे नोरा गोत्यात आली होती. त्यामुळे तिची ईडीनं चौकशी सुरु केली असून याप्रकरणी तिला कोर्टानं समन्स बजावल्याचे कळते आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयानं नोराला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही दिले होते.

एएनआयनं केलेल्या ट्विटनुसार आता नोरा दिल्लीच्या पतियाला कोर्टात दाखल झाली आहे. सुकेश चंद्रशेखरनं केलेल्या दोनशे कोटींच्या मनी लॉड्रींग प्रकरणात नोराचा देखील सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांनी नोराची चौकशी सुरु केली आहे. यापूर्वी सुकेशनं तिहार जेलमधून काही बॉलीवूड अभिनेत्रींची नावं घेतल्याची चर्चा होती. त्यातून ईडीनं प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ आणि नोराकडे पुढील तपास केला जात आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

जॅकलीननं तर सुकेशकडून मोठ्या किंमतीचे गिफ्ट स्विकारल्याचे तपासातून समोर आले होते. जॅकलीनचे आई वडील आणि बहिणीला सुकेशनं आर्थिक मदत केल्याचे दिसून आले होते. याबरोबर सुकेशनं जॅकलीनला जे पत्र लिहिले होते ते देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. सुकेशनं त्या पत्रातून जॅकलीनच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यासगळ्याचा परिणाम जॅकलीनच्या चित्रपटांवरही झाल्याचे बोलले जात आहे.

असं म्हटलं जातं की, तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी अनेक बॉलीवूडमध्ये अभिनेत्री गेल्या होत्या. यासगळ्यात सुकेशनं नोरा फतेहीबाबत खुलासा केला होता. सुकेशनं जॅकलीनला लाखो रुपयांचे गिफ्ट दिले होते ही गोष्टही तपासातून समोर आली आहे. महागड्या भेटवस्तु, कपडे, दिले होते. केवळ जॅकलीनलाच नाहीतर तिच्या घरच्यांना देखील त्यानं दिलेल्या वस्तुंविषयी ईडीनं चौकशी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT