Nupur Sharma Controversy Kashmir files director comment
Nupur Sharma Controversy Kashmir files director comment  esakal
मनोरंजन

Nupur Sharma Controversy: मुस्लिम आंदोलकांना काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकानं ठणकावलं, 'तुम्ही आता...'

युगंधर ताजणे

Nupur Sharma Controversy: भारतीय जनता पार्टी (भाजप) या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. त्यांनी एका मीडिया शो मध्ये मोहम्मद पैंगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावे लागले होते. त्या विधानाचे गंभीर पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या विधानावरुन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मुस्लिम बांधवांच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेतली आहे. (Nupur Sharma Controversy news viral social media

नागरिकांनी नुपूर शर्माच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यास सुरुवात (The kashmir files director) केली आहे. त्यांच्या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शर्मा यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यासगळ्यात बॉलीवू़डच्या काही सेलिब्रेटींनी नुपूर शर्माला पाठींबा दिला आहे. त्यामध्ये कंगनानंतर (Bollywood news) आता द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुपूर शर्माची बाजु घेतली आहे. ते काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत. नुपूर शर्मा यांच्याविरोधात जे काही सुरु आहे ते अतिशय चुकीचे आहे. त्यावरुन अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शनं केल्याचे दिसून आले.

अग्निहोत्री यांनी तर ज्यांनी कुणी शर्मा यांच्याविरोधात निदर्शनं केली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शर्मा यांची बाजु घेतली आहे. मला माफ करा मित्रांनो, पण आपण भारतात आहोत याचा अनेकांना विसर पडला की काय, आपण इराण, इराक किंवा सीरियामध्ये नाही. आजच्या भारतामध्ये असं काही होतंय हे बरोबर नाही. अशा प्रकारे कुणी देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी. देशात आता लवकरच अशी वेळ येणार आहे की, त्यावेळी अशाप्रकारे राग व्यक्त करणाऱ्यांना शिक्षा होईलच.

अग्निहोत्री यांनी आपल्या दुसऱ्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, माझ्या प्रिय शिक्षित मुस्लिम बांधवांनो, तुम्ही आता देशातील जो आतंकवाद आहे त्याच्याविरोधात आवाज उठविण्याची वेळ आली आहे. अशा शब्दांत अग्निहोत्री यांनी नुपूर शर्मा यांच्या बाजुनं प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT