Nusrat Bharucha Trapped In Israel; The story of her movie akeli actually happened in real life SAKAL
मनोरंजन

Nushrratt Bharuccha: 'अकेली'ची कहानी नुसरतच्या खऱ्या आयुष्यातही घडली? इस्त्राइलमध्ये अडकल्यानंतर चाहते चिंचेत

पॅलेस्टाईन आणि इस्त्राइल मध्ये सुरु असलेल्या युद्धात नुसरत भरुचा अडकली आहे

Devendra Jadhav

Nushrratt Bharuccha News: सध्या पॅलेस्टाईन आणि इस्त्राइलमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. इस्त्राइल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाने गंभीर स्वरुप धारण केलं आहे. हमासने केलेल्या हल्ल्यात इस्त्राइल अगणित माणसं मृत्यूमुखी झाली आहेत.

अशातच आज सकाळीच आलेल्या बातमीनुसार सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्राइलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. नुसरतची भुमिका असलेला एक सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्या सिनेमात घडलेली घटना नुसरतच्या खऱ्या आयुष्यात घडली आहे असं म्हटलं जात आहे.

(Nusrat Bharucha Trapped In Israel)

नुसरतच्या सिनेमातली घटना तिच्या रिअल लाईफमध्ये घडली

अभिनेत्री नुसरत भरुचाचा अकेली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये एक मुलगी काही कारणाने इराक यादवी युद्धात अडकते. हा चित्रपट युद्धाच्या वातावरणात अडकलेल्या मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे. अनेक अडथळ्यांनंतरही ती जगण्यासाठी धडपडत असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नुसरत सध्या इस्त्राइल मध्ये अडकल्याने अशीच घटना सध्या तिच्या आयुष्यात घडत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत असून ती सुखरुप भारतात यावी, अशी प्रार्थना करत आहेत.

नुसरत इस्राइलमध्ये अडकली

इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अभिनेत्री नुसरत भरूचा इस्त्राइलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या टीममधील एका सदस्याने या वृत्ताला दुजोरा दिला.

माध्यमांना दिलेल्या निवेदनात नुसरत भरुचा इस्त्राइलमध्ये अडकल्याचे म्हटले आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती.

नुसरत भरुचाशी शनिवारी दुपारी 12.30 वाजता शेवटचा संपर्क झाला. तिथल्या एका तळघरात ती सुरक्षित होती. सुरक्षेच्या कारणास्तव अधिक माहिती उघड करता येणार नाही. मात्र त्यानंतर अद्याप तिच्याशी संपर्क झाला नसल्याचे तिच्य टीमचे सांगणे आहे.

हमासने केलेल्या हल्ल्यात इस्त्राइलमध्ये मृत्यूचं तांडव

इस्त्राइलमध्ये शनिवारी सकाळी हमास दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर रॉकेट हल्ला सुरु केला. २० मिनिटांत तब्बल ५००० रॉकेट गाझा पट्टीतून इस्त्राइलच्या प्रदेशात डागण्यात आले. यात इस्त्राइलचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जातं.

वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. माहितीनुसार, आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक नागरिक आणि लष्करी जवानांचा मृत्यू झालाय. हा आकडा वाढतच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT