Sameer Wankhede Esakal
मनोरंजन

Sameer Wankhede: 'जवान'च्या वादळात वानखेडे गेले 'सुभेदार' चित्रपट पहायला! पोस्ट शेयर करत म्हणाले,...

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान आणि त्याच्या जवान या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. जवानचा ट्रेलर रिलिज झाला आणि चाहत्यांची उत्सूकता आणखीनच वाढली. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच त्यातील एक डायलॉग सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला.

त्या संवादामुळे अधिकारी समीर वानखेडे हे देखील चर्चेत आले. बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर...असा तो संवाद होता. त्यानंतर सोशल मीडियावर वानखेडे हे ट्रेंड करु लागले. नंतर त्यांनी देखील एक ट्विट शेयर केले.

अशातच या वाद विवादात गुरुवारी शाहरुखचा जवान रिलिज झाला तर दुसरीकडे मराठी मनोरंजन विश्वात सुभेदार या सिनेमाची चर्चा आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांनी देखील सुभेदार हा सिनेमा पाहिला आणि त्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे.

समीर वानखेडे यांनी या पोस्टमध्ये सोशल मीडियावर मॉलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, "एक महान योद्धा अन् श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. तान्हाजी शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक आहेत. प्रत्येक भारतीयाने त्यांचे अनुकरण करायला हवे. ते खरे वीर होते."

आता वानखेडेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करताय.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चारही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद आता सुभेदार सिनेमालाही मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT