om bhutkar new movie shyamchi aai released on this diwali SAKAL
मनोरंजन

Shyamchi Aai: दिवाळीत भेटायला येणार श्यामची आई! मुळशी पॅटर्न मधील हा कलाकार साकारणार प्रमुख भुमिका

श्यामची आई सिनेमाच्या रिलीज डेटची अखेर घोषणा झालीय

Devendra Jadhav

शाळा, आजोबा अशा दर्जेदार सिनेमांंमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा दिग्दर्शक म्हणजे सुजय डहाके. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके आता त्याच्या नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे दिग्दर्शित 'श्यामची आई'.

या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे.

(om bhutkar new movie shyamchi aai released on this diwali 2023)

श्मामची आई सिनेमा

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.

तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'श्यामची आई' हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.

हे कलाकार साकारणार श्यामची आईची भूमिका

'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,

सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर , अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

दिवाळीत उलगडणार श्यामची आईची गोष्ट

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते, तिथे 'श्यामची आई' हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने गुरुजींच्या अंर्तमनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य 'श्यामची आई' या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आलं आहे. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना श्यामची आई सिनेमा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाऐवजी महापौर निवास बांधणार; भाजपचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांचा विरोध

Gokul Chairman Election : 13-12 चं गणित अन् 14 चा नियम! 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीतील कायदेशीर पेचावर प्रकाश आबिटकरांचं मोठं विधान; म्हणाले, 'केवळ मनाच्या समाधानासाठी...'

IND vs NZ ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! प्रसिद्ध कृष्णा OUT, कोणत्या खेळाडूला मिळाली संधी?

Mumbai Local: महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचं वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्यांच्या मार्गात बदल, काही ट्रेन रद्द; पाहा वेळापत्रक

Marathi News Live Updates : भारतीय संघाचा UAE कडून ६ गडी राखून पराभव; पाकिस्ताननंतर सलग दुसरा धक्का!

SCROLL FOR NEXT