omg 2 Akshay Kumar didn't take a single rupee for the film? The makers told the truth SAKAL
मनोरंजन

OMG 2 Akshay Kumar: अक्षय कुमारने सिनेमासाठी एक रुपयाही मानधन घेतले नाही? निर्मात्यांनीच सांगितलं सत्य

OMG 2 च्या विषय, आशय कलाकारांचा अभिनय अशा विविध विषयांचं कौतुक होतंय.

Devendra Jadhav

अक्षय कुमारचा OMG 2 सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. लैंगिक शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर सिनेमा भाष्य करतो. OMG 2 च्या विषय, आशय कलाकारांचा अभिनय अशा विविध विषयांचं कौतुक होतंय.

अशातच अक्षय कुमारने OMG 2 साठी अजिबात मानधन घेतलं नाही, अशी गोष्ट सध्या चांगलीच व्हायरल झालीय. यात खरंच तथ्य आहे का? असा खुलासा चक्क OMG 2 च्या निर्मात्यांनी केलाय.

(omg 2 Akshay Kumar didn't take a single rupee for the film?)

OMG 2 साठी अक्षय कुमारने मानधन घेतलं नाही?

OMG 2 चे निर्माते अजित अंधारे यांनी 'पिंकविला'शी बोलताना सांगितले की, अक्षय कुमारने OMG 2 साठी एक रुपयाही घेतला नाही. उलट, हा चित्रपट बनवताना आर्थिक आणि क्रिएटिव्ह पातळीवरील जोखीम आहे, याची त्याला जाणीव होती. त्यामुळे या चित्रपटाच्या संपूर्ण प्रकियेत अक्षय निर्मात्यांच्या पाठीशी उभा राहिला.

अजित पांढरे म्हणाले, "अक्षय आणि आमचे अनेक वर्षांपासुनचे संबंध आहेत. 'ओएमजी', 'स्पेशल 26' आणि 'टॉयलेट: एक प्रेम कथा'च्या वेळेपासून आम्ही एकमेकांसोबत काम करत आहोत. मी सुरुवातीपासुन एका हटके तरीही अर्थपूर्ण स्क्रीप्टसाठी अक्षयच्या पाठीशी कायम उभा आहे. अक्षयशिवाय OMG 2 चा हा धोका पत्करणे अशक्य होते. अक्षय या चित्रपटात (OMG 2) आर्थिक आणि सर्जनशीलपणे सहभागी होता."

OMG 2 ची १०० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरु

अक्षय कुमारच्या OMG 2 या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. आता सहा दिवसांत OMG 2 या चित्रपटाने 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून आता सिनेमा 100 कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल करत आहे.


गदर 2 आणि OMG 2 या दोन्ही चित्रपटात स्पर्धा लागली असली तरी यात सनी देओलच्या गदर 2 ने चांगली कमाई करत OMG 2 ला मागे टाकले आहे. आता या सिनेमाला मिळणारी लोकप्रियता पाहून अखेर अक्षय कुमारने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.


अक्षयने OMG 2 साठी मानले प्रेक्षकांचे आभार

अक्षयने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेयर करत लिहिलं की, 'ओह माय गदर'वर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आणि भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्तम आठवडा दिल्याबद्दल प्रेक्षकांचं खूप खूप आभार. प्रेम आणि कृतज्ञता.' यात अक्षयने OMG 2 आणि गदर 2 या चित्रपटांचे प्रमोशनही केले आहे. दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये दाखल असून ते पाहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पुण्यात नदीपात्रातील चौपाटीमध्ये एकाला जबर मारहाण

SCROLL FOR NEXT