OMG 2 Box Office Collection Akshay Kumar movie net collection : esakal
मनोरंजन

OMG 2 Box Office : अक्षयच्या 'ओएमजी २' ने जीव सोडला! १५ व्या दिवशी टाकली मान, कमाई थंडावली

आता ओएमजी २ चा पंधरावा दिवस असून त्यात कालच्या दिवशी या चित्रपटानं पूर्ण देशभरातून एक कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

OMG 2 Box Office Collection Akshay Kumar movie net collection : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओएमजी २ चा सनीच्या गदर २ सोबत क्लॅश होता. त्यात सनीच्या गदर २ ची सरशी झाली आहे. गदरनं पाचशे कोटींकडे झेप घेतली असताना अक्षयचा ओएमजी २ त्या तुलनेत स्लो झाल्याचे दिसून आले आहे.

२२ वर्षांनी सनीचा गदर २ प्रदर्शित झाला आहे. त्यात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.अशात अक्षयचा ओएमजी २ हा देखील एका दशकाच्या अंतरानं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता ओएमजी २ चा पंधरावा दिवस असून त्यात कालच्या दिवशी या चित्रपटानं पूर्ण देशभरातून एक कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. आता आयुषमान खुराणाचा ड्रीम गर्ल २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गेल्या काही महिन्यांपासून अक्षय कुमार हा त्याच्या मोठ्या चित्रपटासाठी धडपडत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या यापूर्वीच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले होते. त्यात बच्चन पांडेपासून राम सेतूपर्यत अनेक चित्रपटांचे दाखले देता येतील. त्यामुळे त्याला ओएमजीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानुसार या चित्रपटानं अक्षयला मोठी साथ दिली आहे.

अमित राज दिग्दर्शित ओएमजी २ ने आतापर्यत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. त्यात अक्षय कुमार, यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि अरुण गोविल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये ओएमजी प्रदर्शित झाला होता. त्यातील वेगळ्या विषयामुळे तो चर्चेत आला होता. तब्बल अकरा वर्षांनी त्याचा पुढील भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अक्षय कुमारच्या या चित्रपटाला सनीच्या गदर २ ची जोरदार टक्कर होती. त्यामुळे गदर २ विरुद्ध ओएमजी २ असा संघर्ष दिसून आला. त्यात सनीच्या गदर २ ने बाजी मारल्याचे दिसून आले. यावेळी देखील अक्षयच्या ओएमजी २ मध्ये लैंगिक शिक्षणासारख्या वेगळ्या विषयाची मांडणी करण्यात आली होती. त्याला नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा अन् प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

पहिला भाग हा केप ऑफ गुड होप, अश्विन वर्दे, विपूल डी शहा आणि राजेश बहल यांनी निर्मित केला होता. तर अमिलेंदू चौधरी यांनी ओएमजी च्या पहिल्या भागाचे छायाचित्रण केले होते. अक्षयच्या ओएमजी २ नं आतापर्यत एकशे वीस कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. आता मात्र त्याची कमाई थंडावल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT