Sadguru Reaction On OMG 2 : esakal
मनोरंजन

Sadhguru Reaction On OMG 2 : अक्षयचा 'ओएमजी २' पाहिल्यावर सद्गगुरु म्हणाले, 'हा चित्रपट म्हणजे ...'!

अक्षय कुमारचा ओएमजी २ प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. त्याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

युगंधर ताजणे

Sadhguru Reaction On OMG 2 : बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ हा सध्या तुफान चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लक्ष वेधून घेणारा ओएमजी २ आता दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी साऊथचा महानायक रजनीकांतचा जेलर गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारचा ओएमजी २ प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. त्याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याच्यावर कौतूकाचा वर्षावही केला होता. पहिल्या भागात प्रसिद्ध अभिनेते परेश रावल, महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका होत्या. आता सेकंड पार्टमध्ये पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर देखील ओएमजी २ ट्रेंडिंगचा विषय आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

अकरा ऑगस्टला अक्षयचा ओएमजी २ आणि सनीचा गदर हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशात सद्गगुरु यांनी अक्षयचा ओएमजी २नावाचा चित्रपट पाहिला आहे. त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे. त्यांनी अक्षयच्या या बहुचर्चित आणि प्रतिक्षित अशा चित्रपटाचं कौतूक करताना काही गोष्टींकडे लक्षही वेधले आहे. त्यांनी या चित्रपटाचा संबंध हा तरुणाईशी जोडला आहे.

सद्गगुरु यांचे ते व्टिट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणतात, हा चित्रपट पाहिला आणि खूप आनंद झाला. सध्याच्या तरुण पिढीला कशाप्रकारे प्रशिक्षित करता येईल. वेगवेगळ्या गोष्टींचे महत्व कसे पटवून देता येईल याचा कौतूकास्पद प्रयत्न ओएमजी २ मधून करण्यात आला आहे. आपल्या शाररिक गरजा काय आहेत, त्याचे महत्व, त्या कशाप्रकारे पूर्ण करता येईल यावर प्रभावीपणे भाष्य देखील चित्रपटातून करण्यात आले आहे. समाजातील महिलांचे स्थान, त्यांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान याविषयीचे धडे त्यात देण्यात आले आहे.

आता वेळ आली की, आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही महत्वपूर्ण बदल करण्याची. तरुणाईला त्यांच्या शाररिक गरजा, भावना यावर कशाप्रकारे नियंत्रित करता येईल त्याचाही विचार या नवीन यंत्रणेत करावा लागेल. अशी प्रतिक्रिया सद्गगुरुंनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT