vanita kharat, omkar bhojane, vanita kharat wedding SAKAL
मनोरंजन

हास्यजत्रा सोडल्यानंतर पहिल्यांदाच ओंकार Vanita Kharat ला लग्नाचं गिफ्ट द्यायला गेला आणि घडला हा प्रकार

वनिताचा सहकलाकार मित्र ओंकार भोजने तिच्या लग्नाला गैरहजर होता

Devendra Jadhav

Vanita Kharat - Omkar Bhojne News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न केलं. वनिताच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रातील सर्व कलाकार उपस्थित होते.

पण वनिताचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र ओंकार भोजने मात्र गैरहजर होता. अनेकांना वाटलं ओंकारने हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) सोडल्याने वनिताने रागात त्याला बोलावलं नाही. पण लग्नानंतर ओंकार वनिताला भेटायला तिच्या घरी गेलाय.

(Omkar went to give a wedding gift to Vanita Kharat )

वनिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. यात ओंकार वनिताच्या घरी खास गिफ्ट घेऊन आला. पण ओंकारला पाहताच वनिताच्या आतलं प्रेम निर्माण झालंय. तितक्यात वनिताचा नवरा सुमित तिथे येतो. आणि तो ओंकारच्या डोक्यावर टपली मारतो.

"हे सगळं स्किट मध्ये करायचं ती आता माझ्या खऱ्या आयुष्यातली बायको आहे", असं म्हणताच ओंकार वनिताला वहिनी म्हणून हाक मारतो तर वनिता त्याला दाजी म्हणते.

हा धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अशाप्रकारे ओंकार वनीताच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही पण लग्नानंतर तो वनिताची भेट घ्यायला आवर्जून तिच्या घरी गेलेला.

ओंकारने वनितासाठी खास गिफ्ट सुद्धा आणलेलं. वनिता आणि सुमित या नवरा बायकोने ओंकारसोबत खास फोटोही काढला.

ओंकारची प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी सिनेमा 'सरला एक कोटी' गेल्या महिन्यात जानेवारीला रिलीज झाला. सरला एक कोटीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने ओंकार वनिताच्या लग्नाला येऊ शकला नाही अशी शक्यता आहे.

याशिवाय ओंकार लवकरच भाऊ कदम सोबत मालवणी नाटकात काम करणार आहे. वनिताने सुद्धा लग्नानंतर लगेचच 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिता खरातने एकदम थाटामाटात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं.

वनिताने एकदम झक्कास पद्धतीने बॉयफ्रेंड सुमीतच्या गळ्यात वरमाला घातली. सुमित आणि वनिता लग्नानंतर आपापल्या कामाला प्राधान्य देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT