lata mangeshkar Sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar Anniversary: 'पुढच्या जन्मात लता म्हणून जन्म नको',असं का म्हणाल्या होत्या दीदी

लता मंगेशकर गाणी दररोज आसमंतात गुंजत असतात. लता मंगेशकर आज आपल्यात नसल्या तरीही त्यांचे स्वर आणि गाणी आपल्या मनामनात कायम आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. गेल्या वर्षी २०२२ ला लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या. लता मंगेशकर गाणी दररोज आसमंतात गुंजत असतात. लता मंगेशकर आज आपल्यात नसल्या तरीही त्यांचे स्वर आणि गाणी आपल्या मनामनात कायम आहेत.

पण गंमत अशी आहे की ज्या काळात प्रत्येक गायिकेला लता मंगेशकर सारखे व्हायचे होते, लतादीदींनी स्वतः एकदा सांगितले होते की, 'मला पुढच्या आयुष्यात लता मंगेशकर व्हायचे नाही.'एका मुलाखतीत लता मंगेशकर यांनी हे सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.

लता मंगेशकर म्हणाल्या होत्या – 'मला पुढच्या आयुष्यात पुन्हा लता मंगेशकर व्हायचे नाही. आज आम्ही तुम्हाला लता दीदींच्या जुन्या मुलाखतीचा एक किस्सा सांगणार आहोत.

एका मुलाखतीदरम्यान खुद्द लता मंगेशकर म्हणाल्या की, मला पुढच्या आयुष्यात लता मंगेशकर व्हायचे नाही. लता दीदींच्या निधनानंतर त्यांच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

लतादीदींनी जावेद अख्तर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपल्या बोलण्यातून त्यांनी भोगलेल्या दुःखांचे आणि वेदनेचे पदर उलगडले. मुलाखतीच्या शेवटी लता दीदींना विचारण्यात आले होते की त्यांना पुढील आयुष्यात काय व्हायचं आहे, त्यावर लता मंगेशकर यांचे उत्तर होते की त्यांना जर पुन्हा जन्म मिळाला तर काहीही व्हायला आवडेल पण फक्त लता मंगेशकर म्हणून पुन्हा जन्माला यायचं नाही.

त्या यावेळी म्हणाल्या की, लता मंगेशकर होण्याचं जे नुकसान आहे ते फक्त मलाच माहीत त्यामुळे पुन्हा लता होऊन जन्माला यायचं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT