yo yo honey singh
yo yo honey singh  Team esakal
मनोरंजन

यो यो हनी सिंगच्या 'संसाराचा सूर' भरकटला, 'तिचं नेहमीच ऐकत आलोय'

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीनं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग (yo yo honey singh) हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचे कारण म्हणजे यो यो च्या पत्नीनं त्याच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्याच्यावर कौटूंबिक हिंसाचाराचा (domestic violence) आरोपही तिनं केला आहे. ज्यावेळी ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हापासून सोशल मीडियावर (social media) हनी सिंगच्या विरोधात उलट सुलट प्रतिक्रिया पाहायला आणि वाचायला मिळत आहे. न्यायालयानं त्याच्याकडून याबाबत स्पष्टीकरणही मागवलं आहे. त्यावर यो यो हनी सिंगचं एक स्टेटमेंट सध्या व्हायरल झालं आहे. त्यात त्यानं आपल्या पत्नीची पाठराखण केली आहे.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारनं त्याच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आणि हनी सिंगची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. 2014 मध्ये हनी सिंगनं तिची ओळख आपल्या एका रियॅलिटी शो च्या माध्यमातून चाहत्यांना करुन दिली होती. एका मुलाखतीमध्ये शालीनीनं सांगितलं होतं की, तिलाही फारशी यो यो हनी सिंगची गाणी आवडत नाही. त्यावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या शो नंतर हनी सिंग आणि शालीनी यांच्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी समोर येण्यास सुरुवात झाली होती.

हिंदुस्थान टाईम्स दिलेल्या एका वृत्तानुसार, इंडियाज रॉ टँलेट शो प्रदर्शित होण्याअगोदर हनी सिंग थोडासा निराश होता. आणि त्यानं ते शुट करण्याचं टाळलं होतं. पुढे शालीनीनं त्याला त्याबाबत विचारणाही केली होती. चार तासांनंतर ते शुट केलं होतं. अशाप्रकारे त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारे वाद निर्माण होत होता. मात्र यासगळ्यावर हनी सिंगनं सांगितलं, ती माझी मैत्रीण आहे. आणि मी तिचं नेहमीचं ऐकतो. आज जे मी काही आहे त्यात तिचा वाटा सर्वात मोलाचा आहे. त्यामुळे मोठी प्रगती झाली आहे. अशाप्रकारे त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

काल शालिनीनं हनी सिंगच्या विरोधात दिल्ली कोर्टात दावा दाखल केला आहे. त्याच्यावर तिनं कौटूंबिक हिंसाचाराचा आरोपही केला आहे. त्यानं आपल्यावर शाररिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या असून त्याविरोधात आपण न्यायालयात दाद मागितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT