sp balasubrahmanyam 
मनोरंजन

एसपी बालासुब्रमण्यम यांना भारतरत्न देण्याची मागणी,अभिनेते कमल हासननेही केलं समर्थन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक एसपी बाला सुब्रमण्यम यांचं निधन झालं. त्यांच्या या दुःखातून त्यांचे चाहते अजुनही सावरलेले नाहीत. याच दरम्यान सोशल मिडियावर या गोष्टीची मागणी जोर धरु लागली आहे कि बाला सुब्रमण्यम यांना भारत रत्नाने सन्मानित केलं जावं. मेगास्टार कमल हासन सोबत अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी सरकारकडे याविषयी मागणी केली आहे.

बंगळुरुच्या गिरीश कुमार यांनी सगळ्यात आधी ऑनलाईन याचिका दाखल केली यानंतर एका मागोमाग एक अनेक लोक यात जोडले गेले. आता याचिका दाखल करणा-या लोकांची संख्या जवळपास ३५ हजारपेक्षा जास्त झाली आहे. गिरीश कुमार यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते एसपी बालासुब्रमण्यम यांच्या फेसबुक फॅनपेजचे ऍडमिन देखील आहेत.

त्यांनी म्हटलं की, एसपी सर माझे आदर्श आहेत. मी त्यांची गाणी ऐकूनंच लहानाचा मोठा झालो आहे. मी जेव्हा उदास असतो तेव्हा ते माझं मनोबल वाढवतात.केवळ सामान्य माणसंच नाही तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी या संदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र देखील लिहिलं आहे ज्याचं अभिनेते कमल हासन यांनी समर्थन केलं आहे. याआधी संगीत विश्वातील एम.एस. शुभालक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्लाह खां, पंडित रवि शंकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी आणि भूपेन हजारिका यांना संगीत विश्वातील योगदानासाठी भारत रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.   

online campaign for sp bala subrahmanyam bharat ratna kamal haasan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT