sonalee kulkarni birthday  sakal
मनोरंजन

सर्वाधिक मानधन घेणारी सोनाली केवळ 'या' कारणासाठीच करते तडजोड..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच आज वाढदिवस. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रीबद्दल ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का..

नीलेश अडसूळ

Sonalee kulkarni birthday : दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली आणि आपल्या खास लुक मध्ये कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनालीने करोना काळात कुणाल बेनोडेकर (kunal benodekar) सोबत अत्यंत साधे पणाने विवाह उरकला. पण त्यावेळी धुमधडाक्यात लग्न करण्याची हौस पूण झाली नसल्याने सोनालीने पुन्हा एका कुणालशी ल्गनगाठ बांधली. सध्या ते दोघेही मेक्सिकोमध्ये आपला हनिमून एन्जॉय करत आहे. आज १८ मे सोनालीचा वाढदिवस त्या निमित्ताने आम्ही तिची एक खास बात सांगणार आहोत.

नटरंग चित्रपटातून 'अप्सरा' म्हणून लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने आज आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'मितवा','नटरंग', 'हिरकणी', 'झिम्मा' असे अनेक महत्वाचे चित्रपट तिने केले. असे म्हंटले जाते की सोनाली कुलकर्णी ही मराठीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री आहे. सोनाली एका चित्रपटासाठी १५ ते २० लाख रुपये मानधन म्हणून घेते. शक्यतो अभिनेत्री आपल्या मानधनात तडजोड करत नाहीत. पण सोनाली मात्र केवळ एका कारणामुळे आपले मानधन कमी करते.

एका माध्यमात मुलाखती दरम्यान तीला, तू मानधनात कधी तडजोड करतेस का याबाबत विचारले गेले. त्यावेळी सोनाली म्हणाली, 'मी, माझं कुटुंब आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहोत. त्यामुळे फक्त पैशांसाठीच काम करावं; असं मला अजिबात वाटत नाही. या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी बाबांनी मला केवळ दोनच गोष्टी सांगितल्या होत्या की एक; आई नेहमी तुझ्याबरोबर असेल आणि दुसरी म्हणजे कोणतंही काम इच्छा असेल तरच करायचं. पैसा किंवा प्रसिद्धीसाठी करायचं नाही. सिनेमा ही माझी आवड आहे त्यामुळे जी संहिता मला ऐकताक्षणी आवडते; त्यासाठी मी क्षणार्धात होकार देते. तिथे मानधनाचा विचार करत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT