Oppenheimer  Esakal
मनोरंजन

Oppenheimer OTT Release Date: ख्रिस्तोफर नोलनचा 'ओपनहायमर' पहायचा राहिलाय मग या OTT प्लॅटफॉर्मवर घ्या चित्रपटाचा आस्वाद

'ओपनहायमर' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Vaishali Patil

Oppenheimer OTT Release Date: जगाला अणूबॉम्ब आणि त्याची ताकद काय असते हे दाखवून देणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित ओपनहायमर नावाचा चित्रपट हा यावर्षीचा सर्वात मोठ सिनेमा होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा खुपच चांगला प्रतिसाद मिळाला. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित ओपेनहाइमर हा चित्रपट यावर्षी 22 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फी, रॉबर्ट डाउन जूनियर यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

चित्रपटाची कथा 'अमेरिकन प्रोमिथियस' नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, जो जे रॉबर्ट ओपेनहाइमरचा बायोपिक आहे. या चित्रपचटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.

थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर आता 'ओपनहायमर' हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म आला आहे. त्यामुळे जर तुम्ही चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नसेल तर आता तुम्ही घरी बसून हा चित्रपट पाहू शकता.

हा चित्रपट Amazon Prime Video आणि ZEE5 वर उपलब्ध आहे. सध्या तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Videoवर 149 रुपयांमध्ये पाहू शकता.

ZEE5 ने त्याच्या अधिकृत X हँडलवर 'Openheimer' चे पोस्टर शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ओपेनहायमरच्या थरारक जगात पाऊल टाका, जिथे असाधारणपणा केंद्रस्थानी आहे.'


क्रिस्टोफर नोलन यांनी ओपेनहाइमरचे दिग्दर्शन केले आहे. यात सिलियन मर्फी, एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, फ्लोरेन्स पग हे कलाकार आहेत. जे जगभर आधीच खुप प्रसिद्ध आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robotic Surgery Hub : पुणे बनतेय नवे ‘रोबोटिक सर्जरी हब’

Fraud City Hub : नागपूर शहर बनतेय फसवणुकीचे हब; अकरा महिन्यांत घातला १४२ कोटींचा गंडा

Latest Marathi News Live Update : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

Amravati Case : पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरीसोबत केले लग्न; पती, सासू-सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

19-minute viral video mystery: १९ मिनिटांचा व्हायरल व्हिडिओत काय? सोशल मीडियावर धुमाकूळ… शेवटी घडलं तरी काय?

SCROLL FOR NEXT