Oscar nominations riz ahmed became the first Muslim nominated for lead actor Oscar 
मनोरंजन

रिज अहमद पहिला 'मुस्लिम' अभिनेता, मिळालं लीड रोलसाठीचं 'ऑस्कर नॉमिनेशन' 

युगंधर ताजणे

मुंबई - ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी अशा काही घटना घडत असतात त्यामुळे दरवेळी नवीन गोष्टी समोर येतात. यंदाही असाच एक प्रकार समोर आला आहे. मुळचा पाकिस्तानी असणा-या रिज अहमदला मुख्य भूमिकेसाठी नामांकन मिळाले आहे. याप्रकारे नामांकन मिळालेला तो पहिला मुस्लिम कलाकार ठरला आहे. त्याच्यावर सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पहिल्यांदा अशा प्रकारचे नामांकन झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे अनेकांनी त्या कलावंताला शुभेच्छाही दिल्या आहेत. रिजला साऊंड ऑफ मेटलसाठी नामांकन मिळाले आहे.

दोन दिवसांपूर्वी हॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोन्सनं ऑस्करच्या नामांकनाची घोषणा केली होती. त्यात बेस्ट मुव्ही, बेस्ट अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, याशिवाय काही तांत्रिक बाबींशी संदर्भात पुरस्कार जाहिर झाले आहेत. त्यात आनंदाची बाब म्हणजे प्रियंकाच्या द व्हाईट टायगरलाही ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. तसेच रिजला अभिनेत्यासाठी मिळालेलं नामांकन सर्वांसाठी उत्सुकेची गोष्ट ठरत आहे. यंदाचे वर्ष ऑस्करसाठी ऐतिहासिक ठरताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या मुस्लिम अभिनेत्याला नामांकन मिळाले आहे.

रिजच्या साऊंड ऑफ मेटलला अॅवॉर्ड मिळाले आहे. रिज अहमद हा मुळचा पाकिस्तानचा असून तो सध्या ब्रिटिश कलाकार म्हणून काम करत आहे. यापूर्वी एका मुस्लिम कलाकाराला ऑस्कर मिळाले होते. मात्र प्रमुख भूमिकेच्या कॅटगिरीसाठी पहिल्यांदाच अशाप्रकारचे नामांकन मिळाले आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल महर्शला अली याला 2017 मध्ये मूनलाईटसाठी सहाय्यक अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले होते. त्यानंतर त्यानं ग्रीन बुक चित्रपटासाठीही सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर मिळवला होता.

रिज अहमद  यापूर्वी 2017 मध्ये बेस्ट एक्टर इन लीडिंग रोल साठी ग्रॅमी जिंकणारा पहिला मुस्लिम आणि पहिला आशियायी कलावंत होता. त्यानं आतापर्यत रोग वन, वेनोम, द सिस्टर्स ब्रदर्स, नाईटक्रॉलर, फोर लायन्स आणि मुगल मोगली सारख्या चित्रपटांतून काम केले आहे. 25 एप्रिलला ऑस्करच्या विजेत्यांची घोषणा होणार आहे. 
 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT