Oscar Winners Paul Haggis esakal
मनोरंजन

लैंगिक छळप्रकरणी ऑस्कर विजेता Paul Haggis अटकेत; इटली पोलिसांची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

पॉलनं पीडित मुलीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलाय.

ऑस्कर विजेते कॅनेडियन दिग्दर्शक पॉल हॅगिसबद्दल (Oscar Winners Paul Haggis) मोठी बातमी समोर आलीय. पॉलला दक्षिण इटलीमध्ये (Italy) लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता याबाबत एक मोठं अपडेट समोर आलंय. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, पॉलनं स्वतःवरील हे गंभीर आरोप फेटाळून लावल्याचं समोर आलंय. त्यांनी स्पष्टीकरण देताना स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

2017 मध्ये चित्रपट, टेलिव्हिजन कथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक पॉल हॅगिस यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली इटलीमध्ये अटक करण्यात आली. पॉलवर दक्षिण इटलीतील ओस्तुनी इथं एका मुलीवर दोन दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यामुळं त्याला अटक करण्यात आलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता पॉल हॅगिसचं वक्तव्य समोर आलंय. त्यांनी स्वत:वरील छळाचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. पॉलनं आपल्या स्पष्टीकरणात मी निर्दोष असल्याचं म्हटलं असून हे सर्व आरोप चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणाची लवकरात-लवकर चौकशी करा. कारण, मी असं काहीही केलेलं नाहीय. पॉल हॅगिस यांनी हे विधान त्यांच्या वकिलामार्फत सांगितलंय.

पॉल हॅगिस कोण आहे?

69 वर्षीय पॉल हॅगिस हे ऑस्कर विजेते आहेत. क्रॅश या प्रसिद्ध चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. ब्रिंडिसी प्रांतातील ओस्टुनी शहरात (Ostuni Italy) मंगळवारपासून सुरू होणाऱ्या एलोरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हॅगिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. या सोहळ्यापूर्वी पीडिता पॉल हॅगिससोबत राहत होती, असं सांगितलं जातंय.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

पॉल हॅगिस आणि पीडित तरुणी या प्रकरणाच्या काही काळापूर्वी एकमेकांना भेटले होते. त्यानंतर पॉलनं पीडित मुलीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर लैंगिक अत्याचारानंतर पीडितेवर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी दबावही टाकण्यात आला. त्यानंतर पीडितेनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. आता हे आरोप पॉल हॅगिस यांनी त्यांच्या वकिलामार्फत फेटाळून लावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT