Oscars 2023 The Elephant Whisperers Wins Best Documentary Short Subject sakal
मनोरंजन

Oscars 2023: भारताच्या पदरी 'ऑस्कर'सुख.. The Elephant Whisperers या भारतीय शॉर्ट फिल्मला ऑस्कर!!

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा.. भारतीय लघुपटला ऑस्कर..

नीलेश अडसूळ

Oscar 2023: आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण ऑस्कर सोहळ्यात पुरस्कारांची बाजी मारण्यात भारताने सुरुवात केली आहे. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार भारताला पहिला ऑस्कर मिळाला आहे. एक एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारताला चार नामांकनं मिळाली होती. त्यापैकी 'एक एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मला मिळाले होते. 41 मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो.

डॉक्युमेन्ट्रीची कथा एका वयस्क जोडप्यावर आधारित आहे,जे रघु नावाच्या एका अनाथ हत्तीला दत्तक घेतात आणि त्याचे संगोपन करतात. हे जोडपं रघुच्या अस्तित्वाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. फक्त त्याचे संरक्षणच हे जोडपं करत नाही,तर देव मानून त्याची पूजा देखील करतात. या कथानकानं अनेकांच्या मनाला स्पर्श केला. माणूस आणि प्राण्यां मधील निस्वार्थी प्रेमाला दाखवण्यात आलं आहे.

या लघुपतटाला ऑस्कर मिळाल्याने अनेकांच्या माना उंचावल्या आहेत. आता 'नाटू नाटू'ला कधी ऑस्कर मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

चित्रपट क्षेत्रातील जगभरात सर्वात मानाचा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर सोहळा आज लॉस एंजेलिमधील 'डॉल्बी' थिएटरमध्ये पार पडतो आहे. अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा आहे. यंदाचा हा 95 वा ऑस्कर सोहळा असून भारतीयांसाठी तो प्रचंड महत्वाचा आहे. कारण भारताला चार नॉमिनेशन मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT