Oscars 2024  esakal
मनोरंजन

Oscars 2024: श्वानाची हजेरी, नग्न अवस्थेत जॉन सीना आणि अभिनेत्रीचा ड्रेस...; यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात काय-काय घडलं?

Oscars 2024: यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात काय-काय घडलं? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Oscars 2024: ऑस्कर (Oscars 2024) पुरस्कार सोहळ्याची सिनेप्रेमी उत्सुकतेने वाट बघत आहेत. दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं. 10 मार्च रोजी ऑस्कर-2024 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतात आज डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाले. या सोहळ्यात अनेक हटके गोष्टी घडल्या, या घटनांनी अनेकांचे लक्ष वेधले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात काय-काय घडलं? जाणून घेऊयात...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्वानाची एन्ट्री

ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. पण स्पॉटलाइट केवळ एकाच सेलिब्रिटीवर होते. तो म्हणजे, 7 वर्षांचा ॲनाटॉमी ऑफ अ फॉलमधील या सिनेमातील श्वान. या श्वानाचे नाव मेस्सी असं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील मेस्सीच्या हजेरीनं अनेकांचे लक्ष वेधले.

नग्न अवस्थेत स्टेजवर आला जॉन सीना

नुकताच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जॉन हा नग्न अवस्थेत स्टेजवर आलेला दिसत आहे. जॉन सीना हा सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाइन या कॅटेगिरीच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी स्टेजवर नग्न अवस्थेत आला. जॉनला असं पाहून पुरस्कार सोहळ्याला आलेले सर्व सेलिब्रिटी खूप हसले. यावेळी जॉन म्हणाला, "कॉस्ट्युम खूप महत्वाचे आहेत.". 'पुअर थिंग्स'ला सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाइनचा ऑस्कर मिळाला आहे.

अभिनेत्रीचा ड्रेस फाटला

एम्मा स्टोननं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरीतील ऑस्कर पुरस्कार जिंकला. जेव्हा एम्मा पुरस्कार स्विकारायला स्टेजवर आली तेव्हा ती सतत तिच्या ड्रेसला हात लावताना दिसली. पुरस्कार स्विकारल्यानंतर एम्मानं प्रेक्षकांना सांगितलं, "अरेरे. माझा ड्रेस फाटला” त्यानंतर तिनं मागे वळून तिचा ड्रेस प्रेक्षकांना दाखवला.एम्मा स्टोननं पुरस्कार सोहळ्यासाठी मिंट ग्रीन कलरचा वन पीस परिधान केला होता. तसेच तिनं गळ्यात स्टोनचा नेकलेस घातला होता. एम्माच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

Emma Stone

ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाला यंदा ऑस्करमध्ये 13 नामांकने मिळाली. यापैकी सात पुरस्कारांवर या सिनेमानं नाव कोरलं. 'ओपेनहायमर' या सिनेमातील सिलियन मर्फीनं सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीचा पुरस्कार जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT