OTT Releases In October 2023 esakal
मनोरंजन

OTT Releases In October 2023: ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये जायची गरजच नाही! ओटीटीवर होणार मोठा धमाका

ऑक्टोबरमध्ये कोणत्या लोकप्रिय मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होणार याविषयी सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

युगंधर ताजणे

OTT Releases In October 2023: ओटीटी मनोरंजन विश्वात ऑक्टोबरमध्ये मोठा धमाका होणार असल्याची चर्चा आहे. विविध ओटीटीच्यावतीनं अनेक मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा देखील समावेश आहे. त्यामुळे चालू महिना हा प्रेक्षकांसाठी आणि ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

ऑक्टोबरमध्ये कोणत्या लोकप्रिय मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होणार याविषयी सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्या मालिका आणि चित्रपट कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. नेटफ्लिक्स, डिझ्ने हॉटस्टार आणि झी ५ वर मनोरंजनाची आगळी वेगळी ट्रीट चाहत्यांना मिळणार आहे. ऑक्टोबरपासून बिग बॉस १७ ला सुरुवात होणार आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

ऑक्टोबर बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय काही मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित आणि सनी देओल अभिनित गदर २ हा झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सहा ऑक्टोबर रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मेकर्सकडून अद्याप त्याबाबत घोषणा केलेली नाही.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ चर्चेत आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. हा चित्रपट देखील ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबरोबरच तब्बू, अली फजल आओणि वामिका गब्बी यांची खुफिया नावाची सीरिज ही नेटफ्लिक्सवर ५ ऑक्टोबर रोजी रिलिज होणार आहेत.

काला पानी या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये मोना सिंह, आशुतोष गोवारीकर आणि अमेय वाघ यांच्या भूमिका आहेत. मौनी राय आणि ताहिर राज भसीम यांची सुलतान ऑफ दिल्ली नावाची मालिका १३ ऑक्टोबर रोजी डिझ्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.

याशिवाय मोहित रैनाची मुंबई डायरीज सहा ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राईमवर येणार आहे. तर लोकी २ ही लोकप्रिय मालिका सहा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. समंथा आणि विजय देवरकोंडाचा खुशी नावाचा चित्रपटही ऑक्टोबर मध्ये नेटफ्लिक्सवर येणार असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. स्टार व्हर्सेस फूड नावाची मालिका नऊ ऑक्टोबर रोजी डिस्कवरी प्लसवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT