OTT Release 
मनोरंजन

OTT Release : वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर घरबसल्या पाहा चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release: आज प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ओटीटीवर काही वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

OTT Release: सिनेप्रेमी ओटीटीवर (OTT) रिलीज झालेले चित्रपट (Movies) वीकेंडला आवडीनं बघतात. कॉमेडी, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असतात. अशातच आज (9 फेब्रुवारी) ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही वीकेंडला घरबसल्या पाहू शकता. आज रिलीज होणाऱ्या वेब सीरिज तुम्ही बिंच वॉच करु शकता.

नेटफ्लिक्स

आज तुम्हाला नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नेटफ्लिक्सवर आज काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. अल्फा मेल्स 2, अ किलर पॅराडॉक्स, भक्षक, एशेज, गुंटूर करम, लव्हर स्टॉकर, किलर हे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. यामधील भक्षक या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात भूमि पेडणेकरनं प्रमुख भूमिका साकारली आहे.

झी-5

झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज'खिचडी २: मिशन पंथुकिस्तान', लंतराणी, कटेरा आणि पलाशेर बाय हे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

डिज्नी प्लस हॉटस्टार

डिज्नी प्लस हॉटस्टारवर 'आर्य: द लास्ट वॉर' ही सुष्मिता सेनची वेब सीरिज रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मितासोबत इला अरुण, विकास कुमार आणि सिकंदर खेर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT