Paan Singh Tomar Writer Sanjay Chouhan Death esakal
मनोरंजन

Paan Singh Tomar Writer Sanjay Chouhan Death : 'देश के लिये दौडे तो किसने नही पुछा, जब...'

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'पान सिंग तोमर' सारख्या उत्कृष्ट चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Paan Tomar Writer Sanjay Chouhan passed Away : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'पान सिंग तोमर' सारख्या उत्कृष्ट चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले आहे. चौहान यांनी १२ जानेवारी म्हणजेच गुरुवारी मुंबईत रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते.

चौहान यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संजय चौहान यांच्या पश्चात पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा परिवार आहे. त्यांना त्यांच्या लेखनासाठी खूप कौतुकही मिळाले आहे. 'पान सिंह तोमर' व्यतिरिक्त संजय चौहानने तिग्मांशू धुलियासोबत 'साहेब बीवी गँगस्टर' याचेही लेखन केले आहे.

Also Read - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

मुख्य म्हणजे 'आय एम कलाम' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 'मैंने गांधी को नही मारा' आणि 'धूप' हे त्यांचे काही सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत. संजय चौहान यांनी दिल्लीतून पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

सोनी टीव्हीसाठी गुन्हेगारीवर आधारित मालिका 'भंवर' लिहिल्यानंतर ते १९९० मध्ये मुंबईत आले. काल दुपारी १२.३० वाजता ओशिवरा स्मशानभूमीत संजय चौहान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. संजय चौहान यांच्या निधनानंतर चित्रपट जगताशी संबंधित अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला आहे.

संजय चौहान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यासाठी त्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंतीही मिळाली. पान सिंह तोमर शिवाय त्यांनी तिग्मांशु धुलियासोबत साहेब बीवी गँगस्टर देखील लिहिला होता. शिवाय त्यांना आय एम कलामसाठी बेस्ट स्टोरी फिल्म फेयर अॅवॉर्डनं देखील गौरविण्यात आले होते. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. मैंने गांधी को नही मारा आणि धूप सारख्या चित्रपटांसाठी त्यांचे कौतूक केले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MahaRERA Update : बांधकाम व्यावसायिकांना महारेराचा मोठा दिलासा! गृहप्रकल्पांच्या पूर्णत्वाला मिळणार 4 महिन्यांची मुदतवाढ, कोणत्या प्रकल्पांना लाभ?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, इमर्जन्सी लँडिंग

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

SCROLL FOR NEXT