shashank ketkar 
मनोरंजन

पाहिले न मी तुला: प्रेक्षकांसमोर येणार समरचं खरं रूप

समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे?

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘पाहिले न मी तुला’ Pahile Na Mi Tula ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तन्वी मुंडले, आशय कुलकर्णीबरोबर प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकरदेखील Shashank Ketkar प्रेक्षकांना भावतो आहे. (pahile na mi tula marathi serial upcoming episode updates)

प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. ते दोघेही त्यांचं लहानसं का होईना पण सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे, पण या गोष्टीमुळे अपमानित आणि सैरभैर झालेला समर मानसीसाठी ईर्षेला पेटलेला आहे.

आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. समर हा खऱ्या आयुष्यात समर जहागीरदार नसून ‘विजय धावडे’ असल्याचं लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. समर हा स्वार्थी, दुष्ट, कपटी, स्त्री-लंपट, बदला घेण्याची वृत्ती असलेला, एखादी वस्तू किंवा व्यक्ती मनात भरली की ती मिळेपर्यंत जीवाचं रान करणारा, वाट्टेल त्या थराला जाणारा, तर विजय धावडे उर्फ विज्या खाचखळग्यातून चुकीच्या मार्गाने आयुष्य जगणारा, स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची वाताहत करणारा इसम आहे.

लाल डोंगरी नावाच्या झोपडपट्टीत राहणारा. तिथल्या वाईट संगतीत तयार झालेला, मागून मिळत नाही तर हिसकावून घेणारा, लालची आणि खुनशी असा विजय संगीता नावाच्या गरीब साध्या भोळ्या मुलीशी लग्न करून संसार रेटतोय, ते फक्त एका कारणासाठी, कारण ती त्याच्यासाठी लकी आहे. आता समरचं हे खरं रूप मानसीच्या आणि तिच्या परिवारासमोर कधी येणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. पाहिले न मी तुला ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT