Pakistani Actors Worked in Bollywood: Esakal
मनोरंजन

Pakistani Actors: बॉलीवूडमध्ये काम करुन मालामाल झाले 'हे' पाकिस्तानी कलाकार

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्ये काम करण्याचं अनेक कलाकारांच स्वप्न असतं. त्यात विदेशातील कलाकारही मागे नाहीत. विदेशी कलाकारांसोबत आपल्या शेजारीलं देश पाकिस्तांनातील कलाकारांचाही सामावेश आहे. बॉलीवूडमध्ये एक काळ असाही होता की, जेव्हा पाकिस्तानातील अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर जादू पसरवली होती. नाव कमावण्याबरोबरचं हे कलाकार बॉलीवूडमधून करोडो रुपयेही कमावत होते.

आता मात्र या स्टार्सना बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही. तुम्हाला अशा पाकिस्तानी कलाकारांबद्दल सांगतो, ज्यांनी बॉलिवूडमध्ये काम केले आणि प्रसिद्धीसोबतच करोडोंची संपत्तीही मिळवली.

फवाद खान:

यात पहिलं नावं येत ते फवाद खानचं. फवाद हा पाकिस्तानचा खूप मोठा स्टार आहे. त्यानं अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये आपल्या दमदार कामानं चाहत्यांची मने जिंकली आहेत. फवादने पाकिस्तानी सिनेमासोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्याने 'ए दिल है मुश्किल' आणि 'कपूर अँड सन्स' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

मावरा हुसेन:

'किस्सा मेहरबानों' आणि 'सबात' सारख्या अप्रतिम पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलेली मावरा हुसैन हिचा लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये सामावेश होतो. ती तिच्या सौंदर्यासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. पाकिस्तानी सिनेमांसोबतच तिने बॉलिवूडमध्येही तिचं नशीब आजमावलं आहे. 'सनम तेरी कसम' या चित्रपटातील तिच्या आभिनयाला चांगली दाद मिळाली. भारतातही तिची लोकप्रियता आहे.

इम्रान अब्बास नकवी

इम्रान अब्बास नकवीने पाकिस्तानी टीव्ही मालिकांमध्ये खूप काम केले आहे. 'तुम कौन पिया', 'खुदा आणि मोहब्बत' आणि 'अमानत' यांसारख्या हिट मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. इम्रान अब्बास हा त्याच्या एक्स्प्रेशनसाठी ओळखला जातो. 'ए दिल है मुश्कील', 'जानीसार' आणि 'क्रिएचर' या बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आणि त्यांना खूप पसंती मिळाली.

वीणा मलिक:

वीणा मलिक पाकिस्तानी सिनेमांसोबतच बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बिग बॉससह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून तिने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.

माहिरा खान:

माहिरा खान तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. 'हमसफर' आणि 'सदके तुम्हारे' सारख्या मालिकांमध्ये तिने अप्रतिम काम केलं आहे. यासोबतच ती शाहरुख खानसोबत 'रईस' या चित्रपटात बॉलिवूडमध्ये दिसली होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली. तिला अजूनही बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT