Mahira Khan Wedding Outfit
Mahira Khan Wedding Outfit Sakal
मनोरंजन

Mahira Khan Wedding: दुबईतल्या रोझमीन माधवजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन बनवला आहे माहिरा खानच्या लग्नाचा ड्रेस

वैष्णवी कारंजकर

पाकिस्तानची सर्वात मोठी सुपरस्टार माहिरा खानने तिचा प्रियकर सलीम करीम याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. यापूर्वी अली अस्करीसोबत लग्न झालेल्या या अभिनेत्रीला तिच्या पहिल्या लग्नापासून अझलान हा मुलगा आहे. या जोडप्याने त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या साथीने पाकिस्तानमध्ये छोटेखानी लग्न केले.

माहिरा खानने तिच्या लग्नामध्ये पेस्टल रंगाच्या कपड्यांची निवड केली होती. लॉनमध्ये झालेल्या या समारंभासाठी तिने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. पांढरा ब्लाऊज, लेहेंगा, डोक्यावरून घेतलेली ओढणी आणि लांब सुंदर बुरखा असा पोशाख तिने परिधान केला होता. तिचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर फराज मनन यांनी डिझाईन केला होता.

रुंद चौकोनी नेकलाईन असलेला ब्लाऊज, पूर्ण लांबीच्या बाह्या, खोल मागचा गळा आणि त्यावर सुंदर असे खडे लावलेले होते. या कपड्यांवर सुंदर असे कढाई वर्कही केले होते.यावर तिने भरगच्च ज्वेलरी घातली होती. तिचा घागरा मोठा घेर असलेला होता. यावर तिने दोन ओढण्या घेतल्या होत्या. एक ओढणी खांद्यावर निऱ्या घालून घेतलेली होती, तर दुसरी ओढणी तिने बुरखा म्हणून परिधान केली होती. दोन्ही ओढण्या स्कॅलोपड एम्ब्रॉयडरी आणि नाजूक सिक्विन वर्कने सजलेले होते

तिच्या लग्नातला हा ड्रेस दुबईतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व रोसेमिन माधवजी यांच्या लग्नातल्या पोशाखाची आठवण करून देणारा होता. रोसेमिन यांनीही सुंदर बुरख्यासह अशाच फिकट रंगाचा घागरा घातला होता. माहिराने आकर्षक डायमंड चोकर नेकलेस निवडला, ज्याला मॅचिंग झुमके आणि बिंदीही तिने लावली होती. त्याशिवाय, आयशॅडो, मस्करा, ब्लश, न्यूड लिपस्टिक असा मेकअपही तिने केला होता. पुल्ड-बॅक बनने तिचा लूक अगदी शोभून दिसत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda Resigns: जे पी नड्डा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; 'हे' कारण आलं समोर

Ashish Shelar : ''पक्ष फोडायचा होता... त्यांना धडाच शिकवायचा होता'' आशिष शेलार स्पष्टच बोलून गेले

Chandrakant Patil : देशात लोकसभा नावाचे लग्न! लोकसभेच्या लग्नासाठी विभक्त झालेली कुटुंब एकत्र

MS Dhoni IPL 2024 : एम एस धोनीची नवी पोस्ट, नव्या 'रोल'चा फोडला बॉम्ब

Google Issues Apology : ‘गुगल’ने मागितली पंतप्रधानांची माफी! ‘जेमिनी’च्या गोंधळासंदर्भात केंद्राच्या नाराजीनंतर उपरती

SCROLL FOR NEXT