Salman Emraan 
मनोरंजन

इमरान हाश्मी vs सलमान खान; 'टायगर ३'मध्ये लढणार भारत-पाकिस्तानचे टायगर्स

तब्बल ३५० कोटी रुपये बजेटचा चित्रपट

स्वाती वेमूल

मार्च महिन्यात सलमान खान Salman Khan आणि कतरिना कैफने Katrina Kaif आगामी 'टायगर ३'च्या Tiger 3 शूटिंगला सुरुवात केली. मनिष शर्मा दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये सलमान-कतरिनाने त्यांचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर अभिनेता इमरान हाश्मीसुद्धा Emraan Hashmi त्याठिकाणी शूटिंगसाठी पोहोचला. अत्यंत कडेकोट सुरक्षेत इमरानचं शूटिंग पार पडलं, कारण सेटवरील इमरानचा लूक निर्मात्यांना अजिबात लीक होऊ द्यायचा नव्हता. पण आता इमरान या चित्रपटात 'ISI एजंट'ची भूमिका साकारत असल्याची माहिती समोर येत आहे. 'पिंकविला' या वेब साइटने यासंदर्भातील वृत्त दिलं. (Pakistani Tiger vs Indian Tiger as ISI Agent Emraan Hashmi locks horn with Salman Khan in Tiger 3)

चित्रपटात इमरान हाश्मी आणि सलमान खान एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहेत. पाकिस्तानचा टायगर विरुद्ध भारताचा टायगर असा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

जून महिन्यात पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. परदेशातही या चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे. तब्बल ३५० कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट भारतातील सर्वांत मोठा अॅक्शन थ्रिलर असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT