Palak Tiwari Ibrahim Ali Khan Break Up News viral  esakal
मनोरंजन

Ibrahim-Palak : सैफ अली खानच्या लेकाचं अन् श्वेता तिवारीच्या लेकीचं 'ब्रेक अप'! 'भाईजान'चा खुलासा...

सलमान खानच्या ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते त्या बहुप्रतिक्षित अशा किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ibrahim-Palak Tiwari : सलमान खानच्या ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते त्या बहुप्रतिक्षित अशा किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यातील सलमानच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत तर नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे सलमानला ट्रोल केले आहे.

सलमानच्या या नव्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉचिंगच्या दरम्यान त्यानं सहकाऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यांची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा लेक इब्राहिम खान आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या मुलीची पलकच्या डेटिंगची चर्चा रंगली होती. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यासगळ्यात सलमानच्या त्या प्रतिक्रियेनं मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

इब्राहिम आणि पलकमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. किसी का भाई किसी की जानमध्ये सलमानसोबत शहनाज गिल, पलक तिवारी, झळकणार आहेत. यावेळी सलमाननं सेटवरील काही किस्से शेयर केले असून त्यातून पलकचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. यासगळयात सलमाननं पलकच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी पोलखोल केली आहे.

सलमाननं दिलेल्या त्या हिंटमुळे पलक आणि इब्राहिममध्ये ब्रेक अप झाल्याचे बोलले जात आहे. ट्रेलरच्या लॉचिंगच्या वेळी पलकचा तोल गेला होता आणि ती पडता पडता वाचली होती. यासगळ्यात सलमाननं त्यावरुन तिला चिडवले. ती यापूर्वी पहिल्यांदा प्रेमात पडली आहे. त्यावेळी तिनं डोळ्यानं सलमानला काही न बोलण्यास सांगितले. सिद्धार्थसोबत पलकची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. असे सलमाननं सांगितले.

नेटकऱ्यांनी यावरुन वेगळाच अंदाज बांधला असून इब्राहिम आणि पलकचं ब्रेक अप झाल्याचे समजून घेतले आहे. ती आता सिद्धार्थसोबत रिलेशनमध्ये असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीमुळे चाहत्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT