Pallavi Joshi angry as Naseeruddin Shah esakal
मनोरंजन

Pallavi Joshi On Naseeruddin Shah : 'पहिल्यांदा चित्रपट पाहा, मग बोला'! पल्लवी जोशी संतापल्या

गेल्या काही दिवसांपासून नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत.

युगंधर ताजणे

Pallavi Joshi angry as Naseeruddin Shah: नसिरुद्धीन शहा जे काही बोलतात ते सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होते. त्यामुळे मात्र नेटकऱ्यांमध्ये, प्रेक्षकांमध्ये वेगळीच भावना तयार होते. अशावेळी त्यांनी जे चित्रपट पाहिले नाहीत त्यावर बोलणे कितपत उचित आहे, असा प्रश्न प्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या पल्लवी जोशी यांनी नसिरुद्धीन शहा यांना केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी सनी देओलचा गदर आणि द काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांवर केलेलं वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांनाही उधाण आले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिर फाईल्सवरुन मोठा वाद झाला होता. त्या चित्रपटामध्ये असलेला हिंदू पंडित आणि मुस्लिम हा विषय चर्चेचा विषय होता.

Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

नसिरुद्धीन शहा यांनी सध्याच्या काळात काश्मिर फाईल्स आणि गदर २ साऱख्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहून अस्वस्थ होतो. अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती. आता त्यावर पल्लवी जोशी यांनी शहा यांना चांगलेच सुनावले आहे. यापूर्वी अग्निहोत्री यांनी देखील नसिरुद्धीन शहा यांचे कान टोचले आहेत.

पल्लवी जोशी म्हणाल्या, नसिरजी जे काही बोलतात ते लगेच सोशल मीडियावर व्हायरल होते. मी त्यांना सांगू इच्छिते की, मी देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. तेव्हा ते काही बोलतात ते वाचते. ऐकते. त्यांनी द काश्मिर फाईल्स नावाचा चित्रपट काही पाहिलेला नाही. अशावेळी त्यांना माझे सांगणे आहे की, त्यांनी हा चित्रपट पाहावा मग त्यावर बोलावे.

सध्या पल्लवी जोशी निर्मित आणि अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सिन वॉर नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor Vehicle Tax: वाहनधारकांना मोठा दिलासा! नवीन वाहनांवर ५०% पर्यंत कर सूट मिळणार; सरकारने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती?

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्स जळून खाक, चालकाचा होरपळून मृत्यू

Pune Shocking Incident : ऐकाव ते नवलच! पतीनं झोपेचं सोंग घेतलं म्हणून उकळता चहा आणला अन् नको 'त्या' ठिकाणी ओतला...

Mobile Phone Tips: मोबाईलच्या चार्जिंग पोर्टजवळ असणारा हा छोटासा छिद्र कशासाठी असतो? जाणून घ्या

Students Protest : MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार, रस्त्यावर येत सरकारविरोधात केल्या घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT