palyad marathi movie release on 4 november trailer cast shashank shende devika daftardar
palyad marathi movie release on 4 november trailer cast shashank shende devika daftardar  sakal
मनोरंजन

मुक्ती देईन म्हणजे काय रं? आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवलेला 'पल्याड' येतोय या दिवशी..

नीलेश अडसूळ

palyad marathi movie : मराठी चित्रपट म्हणजे आशयाचे वेगळेपण आणि दर्जेदार मांडणी. गेल्या काही वर्षात विविध विषयांवरील मराठी चित्रपटांनी ही जणू सिद्धच केले आहे. असाच एक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त केलेला 'पल्याड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

(palyad marathi movie release on 4 november trailer cast shashank shende devika daftardar )

‘पल्याड’ चित्रपटाने गोव्यात झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलऑफ इंडिया (इफ्फी) मध्येही माजी मारली, एवढेच नव्हे तर आजवर १४ महोत्सवांमध्ये या चित्रपटाने महाराष्ट्राचे नाव गाजवले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पल्याड’चा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरने सर्वांची झोप उडवली. ‘मुक्ती देईन म्हणजे काय रं आबा?’ या लहान मुलाच्या संवादानेच चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. पाप-पुण्याच्या फेऱ्यातून मुक्त करणं म्हणजे काय, प्रेताचे अंतिम कार्य पार पाडणाऱ्या समाजाच्या व्यथा नेमक्या काय आहेत, त्यांचं जगणं किती खडतर आहे यावर हा चित्रपट भाष्य करतो.

‘पल्याड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश दुपारे यांनी केलं आहे. तर निर्मिती चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माता पवन सादमवार, सूरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे.

‘पल्याड’चे दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी सांगितले की, अहमदनगरमधील सुदर्शन खंडागळेसोबत कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पाहिलेल्या प्रथेवर कथा बेतली आहे. यात स्मशानजोगी समाजाच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. कथा लिहिताना त्यांची व्याप्ती इतकी मोठी झाली की त्याचा आवाका शॉर्ट फिल्मपेक्षाही मोठा झाला. त्यामुळे ‘पल्याड’ चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटात शशांक शेंडे यांनी साकारलेला महादू, त्यांचा नातू आठ वर्षांचा शंभू आणि शंभूची आई लक्ष्मी अशा स्मशानजोगी समाजातील कुटुंबाची कथा आहे. शंभू जेव्हा समवयस्क मुलांच्या मागे मागे शाळेपर्यंत जातो, खिडकीतून त्यांना शाळेत शिकताना बघतो, शिक्षणाची ओढ असल्याने शाळेभोवती फेऱ्या मारतो. त्याच्या आईलाही आपल्या मुलाला शिकवायचं आहे. त्याने प्रथा-परंपरेतून बाहेर पडून मोठा ऑफिसर बनावे असं तिचंही स्वप्न आहे, पण आजोबांना वाटतं की माझ्यापश्चात नातवानं आपला वारसा पुढे चालवावा. त्यामुळे तो शिक्षण घेऊन काय करणार? असा त्यांना प्रश्न असतो. शंभूच्या शिक्षणाला समाजाचाही विरोध आहे. त्यामुळे आजोबा, नातू आणि सूनबाई काय करतात ते या चित्रपटात पाहायला मिळेल. शशांक शेंडे यांच्यासह अभिनेत्री देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT