Prabhas Comeback In India: Esakal
मनोरंजन

Prabhas: गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर भारतात परतला प्रभास! 'सालार'च्या प्रमोशनसाठी झाला सज्ज

प्रभास अनेक दिवसांपासून गुडघेदुखीने त्रस्त होता. आता त्याच्यावर युरोपमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे.

Vaishali Patil

Prabhas Comeback In India: साऊथ सुपरस्टार प्रभास हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपुर्वी त्याच्या सोशल मिडिया अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली होती. त्यानंतर प्रभासच्या टिमने हे सर्व प्रकरण हाताळले.

'आदिपुरुष' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांना प्रभासच्या आगामी 'सालार: पार्ट सीझफायर' या चित्रपटाची उत्सुकता आहे.

प्रभास चा सालार चित्रपट रिलिजसाठी सज्ज झाला आहे. मात्र दुसरीकडे प्रभास परदेशात गेला होता. आदिपुरुष फ्लॉप झाल्यानंतर प्रभास कॅमेऱ्यापासून लांबच राहिला. या सगळ्यात प्रभास बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता.

सततच्या शुटिंगमुळे त्याची दुखापत आणखीनच वाढली होती. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यामुळे गुडघ्याच्या उपचारासाठी प्रभास युरोपला गेला होता.

तिथे प्रभासवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर प्रभास अखेर भारतात परतला आहे.

सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विमानतळावरुन परत येत असताना पापाराझींनीही त्याला स्पॉट केलं. यावेळी प्रभास काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला. त्याने चष्मा आणि मास्क लावून चेहरा लपवला होता.

प्रभासचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसराकडे तो भारतात परतल्याने त्याचे चाहते खुप आनंदी झाले आहे. आता प्रभास त्याच्या सालार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर प्रभासला आगामी 'सालार' कडून खुप अपेक्षा आहेत.

'सालार' दोन भागात रिलीज होणार आहे. सालारमध्ये प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू दिसणार आहेत. सालार हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.

हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर तो 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT