Pankaj Tripathi fainted while shooting a scene in agneepath omg 2 review showtimings SAKAL
मनोरंजन

Pankaj Tripathi: 'अग्निपथ'च्या शुटींगवेळी 'तो' सीन करताना पंकज त्रिपाठी बेशुद्ध झाले अन्...

OMG 2 मध्ये काम करणाऱ्या पंकज त्रिपाठींनी अग्निपथ सिनेमाचा भयंकर अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा OMG 2 सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. अक्षय - पंकजचा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर तुफान गर्दीत सुरु आहे. पंकज त्रिपाठींनी करिअरच्या सुरुवातीला अनेक सिनेमांमधुन छोट्या छोट्या भुमिका साकारल्या.

यातलाच एक महत्वाचा सिनेमा म्हणजे अग्निपथ. पण अग्निपथ सिनेमाचा भयंकर अनुभव पंकज त्रिपाठींनी शेअर केलाय

(Pankaj Tripathi fainted while shooting a scene in agneepath omg 2 review showtimings)

अग्निपथ सिनेमातलं ते दृश्य आणि...

हृतिक रोशन आणि संजय दत्त यांचा अग्निपथ सिनेमा खुप गाजला. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर यशस्वी झाला. या सिनेमात पंकज त्रिपाठी कांचाचा राईट हँड दाखवलाय. या सीनमध्ये पंकजला हृतिक रोशन मारतो.

हा सीन गणपती विसर्जनाच्या दिवशी शुट करण्यात आलाय. या सीनमध्ये आजुबाजुला प्रचंड गर्दी दिसते. पण या सीनच्या शुटींगवेळेस पंकज त्रिपाठी बेशुद्ध झाले होते.

पंकज त्रिपाठींनी श्वास रोखला आणि ते बेशुद्ध झाले

पंकज त्रिपाठींनी एका मुलाखतीत खुलासा केला की, "त्या सीनमध्ये मला 3-4 वेळा हृतिक चाकूने वार करतो. त्यावेळी मी माझा श्वास रोखून धरला कारण एखाद्या व्यक्तीला वार केल्यावर त्याला प्रत्यक्षात कसे वाटते हे मला माहित नव्हते. जर तुम्ही ते दृश्य नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की त्यात माझे डोळे लाल झाले आहेत."

अभिनेता पंकज त्रिपाठी पुढे खुलासा केला त्यानुसार.. हे दृश्य वास्तविक दिसण्यासाठी, पंकजने विचार न करता बराच वेळ आपला श्वास रोखला. दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेकला मात्र पंकज बेशुद्ध पडला. त्यावेळी शुटींग करताना आजुबाजुला कॅमेरा फिरत असताना पंकज त्रिपाठींच्या डोळ्यांवर अंधारी आली. आणि बराच वेळ श्वास रोखून धरल्यामुळे ते कोसळलो. त्यामुळे काही लोक त्यांना उचलायला आले. आणि जेव्हा पंकज जागे झाले त्यांच्या आजुबाजुला बरीच माणसं उभी होते

येत्या शुक्रवारी बॉलीवूडमध्ये अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठींचा OMG 2 प्रदर्शित होणार आहे. पंकज आणि अक्षय कुमारचा OMG 2 प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. त्याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याच्यावर कौतूकाचा वर्षावही केला होता. पहिल्या भागात प्रसिद्ध अभिनेते परेश रावल, महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका होत्या.

आता सेकंड पार्टमध्ये पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर देखील ओएमजी २ ट्रेंडिंगचा विषय आहे. सिनेमातील पंकज यांच्या भुमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT