pankaj tripathi, azamgarh, pankaj tripathi news SAKAL
मनोरंजन

आगामी सिनेमाचं पोस्टर रस्त्यावर लावलं.. Pankaj Tripathi च्या डोक्यातच गेलं.. प्रकरण थेट पोलिसात

पंकज त्रिपाठी यांचा आगामी सिनेमा म्हणजे आझमगढ

Devendra Jadhav

Pankaj Tripathi News: उत्तमोत्तम आणि दर्जेदार भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. पंकज त्रिपाठी विविध सिनेमांमधून हटके भूमिका साकारत असतात. पंकज त्रिपाठी यांची प्रत्येक भूमिका आधीपेक्षा वेगळी असते.

पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमातली भूमिका सुद्धा आधीपेक्षा वेगळी होती. परंतु पंकज त्रिपाठी यांनी आगामी सिनेमाच्या निर्मात्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केलीय. काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

(pankaj tripathi file police compliant after he see his movie poster name azamgarh)

पंकज त्रिपाठी यांचा आगामी सिनेमा म्हणजे आझमगढ. या सिनेमाचं पोस्ट पंकज त्रिपाठी यांनी रस्त्यावर पाहिलं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आझमगढ हा सिनेमा 10 वर्ष जुना आहे. १० वर्ष जुन्या चित्रपटाचे पोस्टर मुंबईत होर्डिंग्ज म्हणून लावण्यात आले होते.

आजकाल मुंबईत रस्त्याच्या कडेला 'आझमगढ' चित्रपटाचे मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळतात. होर्डिंगमध्ये पंकज त्रिपाठी मौलवीच्या गेट अपमध्ये दिसत आहेत.

हा मौलवी तरुणांना दहशतवादाचा मार्ग दाखवतो. पंकज त्रिपाठींच्या निदर्शनास हि गोष्ट येताच ते संतप्त झाले. याशिवाय आझमगढ सिनेमाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांवर ते कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते कमलेश कुमार मिश्रा हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. शॉर्ट फिल्म आहे असं सांगून दिग्दर्शकांनी पंकज त्रिपाठींकडून ३ दिवस काम करवून घेतले. पण आता पंकज त्रिपाठी यांचा फोटो पोस्टरवर लावून सिनेमाची टीम लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

छोटीशी भूमिका असूनही ज्या पद्धतीने पोस्टरच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी यांचं प्रमोशन करण्यात आलंय हे अत्यंत चुकीचं आहे असं पंकज त्रिपाठी यांचं म्हणणं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते कमलेश कुमार मिश्रा हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. शॉर्ट फिल्म आहे असं सांगून दिग्दर्शकांनी पंकज त्रिपाठींकडून ३ दिवस काम करवून घेतले. पण आता पंकज त्रिपाठी यांचा फोटो पोस्टरवर लावून सिनेमाची टीम लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

छोटीशी भूमिका असूनही ज्या पद्धतीने पोस्टरच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी यांचं प्रमोशन करण्यात आलंय हे अत्यंत चुकीचं आहे असं पंकज त्रिपाठी यांचं म्हणणं आहे.

याउलट आझमगढ सिनेमाचे निर्माते संजय भट यांनी हा सिनेमा २०१७ ला शूट झालाय असं सांगितलं आहे. पंकज त्रिपाठी यांनी या सिनेमासाठी मानधन घेतलं नाही, असंही स्पष्ट होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Nagpur Court: थकीत फीसाठी विद्यार्थिनीला शाळेतून काढणे बेकायदेशीर; उच्च न्यायालय, शिक्षणाचा अधिकार सर्वोच्च अधिकार असल्याचे निरीक्षण

लोकप्रिय अभिनेत्रीला मालिका सेटवर अपमानास्पद वागणूक; स्वत:च केला मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

नवरा असावा तर असा! घरातील काम करताना दिसले अविनाश नारकर, Viral Video होताच कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT