Pankaj Tripathi love story he fall in love with mridula in 10th standard and mridula tripathi waiting long for him sakal
मनोरंजन

Pankaj Tripathi: दहावीत असतानाच ठरवलं.. लग्न करीन तर.. पंकज त्रिपाठीची भन्नाट लव्हस्टोरी..

अभिनेता पंकज त्रिपाठीच्या लव्हस्टोरीमधलं हे गुपित खास तुमच्यासाठी..

नीलेश अडसूळ

pankaj tripathi: कालच अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या बायोपिकची घोषणा झाली आणि अटलजींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठीचा चेहरा समोर आला. त्याच्या या लुकने सर्वांनाच वेड लावलं आणि त्याचा दमदार अभिनय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. कारण गेल्या काही वर्षात पंकजने त्याच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मग चित्रपट असो किंवा वेबसिरिज, पंकज आहे म्हणजे काहीतरी दर्जेदार असणार याची प्रेक्षकांना खात्री वाटते. पण पंकजची लव्हस्टोरी पण एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे.

(Pankaj Tripathi love story he fall in love with mridula in 10th standard and mridula tripathi waiting long for him)

अत्यंत स्ट्रगल करून इथवर आलेल्या पंकजने सुरुवातीच्या काळात अगदी तुटपुंज्या मानधनात काम केले, पण त्याचा अभिनय इतका निर्भेळ आणि सकस होता की त्याला काम मिळत गेले आणि आज तो कोट्याधीश झाला आहे. एक सर्वसामान्य अभिनेता ते लोकप्रिय अभिनेता यासाठी पंकजला जसा संघर्ष करावा लागला, तसाच प्रेमासाठीही करावा लागला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पंकज दहावीत असताना प्रेमात पडला होता.

पंकज त्रिपाठीच्या पत्नीचं नाव मृदुला आहे. आपल्याला काही झालं तरी अभिनेताच व्हायचं हे स्वप्न पूर्ण होण्यात त्याच्या पत्नीचा वाटा मोठा आहे. तिची साथ आणि पाठींबा याच्या जोरावर पंकज आज बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता झाला आहे. त्याच्या लवस्टोरीविषयी फार कमी जणांना माहिती आहे. दहावीत असतानाच तो प्रेमात पडला होता. तेव्हापासून त्याच्या लवस्टोरीनं आकार घ्यायला सुरुवात केली.

दहावीत असताना त्यानं पहिल्यांदा मृदुलाला पाहिलं. 'मी पाहताच तिच्या प्रेमात पडलो. आपल्याला या मुलीशीच लग्न करायचं हे तेव्हाच ठरवून टाकलं होतं.' अशी आठवणही पंकजनं एका मुलाखतीतून सांगितली होती. पण पंकजला शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं तेव्हा मात्र मृदुलाने लग्न केलं असेल असं त्याला वाटलं. पण तसं अजिबात नव्हतं तीही त्याच्यासाठी थांबली होती. दरम्यान एकमेकांना पत्र पाठवून त्यांच्यातील लवस्टोरी आकाराला येत होती.

शेवटी तो ठरल्याप्रमाणे मृदुलाशी विवाहबद्धही झालाच. त्यानं अनेकदा या गोष्टीचा आपल्या मुलाखतीत उल्लेखही केला होता. तो म्हणतो, आज मी जे काही आहे त्याचे सारे श्रेय मी माझ्या पत्नीला देतो. त्याच्या लग्नावरुन काही काळ कुटूंबामध्ये वाद होता. मात्र कालांतरानं तो वाद मावळल्याचेही पंकजनं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT