pankaja munde participate in bus bai bus show on zee marathi she talks about her college life boyfriend and propose sakal
मनोरंजन

मित्र, प्रियकर, प्रपोज.. कसं होतं पंकजा मुंडेंचं कॉलेज लाईफ?

पंकजा मुंडेंना कॉलेज लाईफमध्ये कुणी प्रपोज केलंय का? नक्की वाचा..

नीलेश अडसूळ

pankaja munde : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या आगामी कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जातात. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. आता भाजप आमदार पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये पंकजा आपल्या कॉलेज लाईफ बद्दल सांगताना दिसत आहेत. (pankaja munde participate in bus bai bus show on zee marathi she talks about her college life boyfriend and propose)

पंकजा मुंडे सहभागी झालेल्या 'बस बाई बस' च्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी बस मध्ये सहभागी झालेल्या एका महिलेनं पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला की, 'तुम्ही मुंबईच्या जय हिंद कॉलेज मध्ये होतात, त्यावेळी तुमचे वडीलही गृहमंत्री होते. त्यामुळे तुम्हालाही बरीच सेक्युरिटी, बॉडीगार्ड असतील?' त्यावर पंकजा म्हणाल्या, 'हो.. माझ्या भोवती भरपूर सुरक्षा होती. कारण वडील गृहमंत्री, त्या त्यांचे गुन्हेगारी विश्वावर विशेष लक्ष असल्याने मलाही सुरक्षा पुरवली जायची. माझ्या भोवती पण बॉडीगार्ड असायचे. पण त्यामुळे मला कॉलेज लाईफ जगता आलं नाही. किंबहुना लोक मला घाबरायचे. पण एकदा दोस्ती झाली कि झाली,' असं त्या म्हणाल्या.

'असे असतानाही यातून मार्ग काढत कधी कुणी तुम्हाला प्रपोज केले आहे का?' असाही प्रश्न पुढे त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'तसा प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे मला तो सुखद अनुभव मिळाला नाही' . पंकजा यांच्या या उत्तराने सर्वांना हसू येतं. याशिवाय त्यांनी अनेक राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यावर गप्पा मारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT