KIran Mane Google
मनोरंजन

किरण माने: 'पॅनोरमा'ने 5 कोटी भरपाई द्यावी; माफी मागून कामावर घ्यावं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: सिने अभिनेते किरण माने यांनी आज पत्रकार परिषद घेत पॅनोरमा एंटरटेनमेंटवर आरोप केले आहेत. तसेच त्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. त्यांचे वकील असीम सरोदे यांनी आज त्यांची भूमिका मांडली आहे. पॅनोरमा कंपनीने त्यांना पाच कोटींची नुकसान भरपाई द्यावी, लेखी पद्धतीने माफी मागावी, त्यांना पुन्हा सन्मानाने काम करण्यासाठी आमंत्रित केलं पाहिजे तरच हे प्रकरण मिटेल अन्यथा पुढची न्यायालयीन कार्यपद्धती अवंलबू, असा इशारा किरण माने यांच्याकडून देण्यात आला आहे. किरण माने यांनी यावेळी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. जात वर्चस्व आणि इतर कलाकारांच्या वर्तनावरही भाष्य केलंय.

यावेळी बोलताना किरण माने यांनी म्हटलंय की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे आणि जातीयवादामुळे माझ्यासोबत हा अन्याय झाला आहे. हा फिल्म इंडस्ट्रीतील जातीयवादही आहे. पहिल्या दिवसापासून माझं एकचं मत आहे की मला काढण्यात आगोदर मला नोटीस का देण्यात आली नाही? माझी बाजू का ऐकून घेतली नाही? हे मराठी अभिनेत्यासोबत असं होणे हे चुकीचं आहे. महिलांसोबत गैरवर्तन हा माझ्यावर आरोप आहे आणि हे मी मान्य करु शकत नाही. असा आरोप असेल तर मला आधीच का सांगितलं नाही? हे सगळं नंतर का उकरुन काढण्यात आलं? असा सवालही त्यांनी केला आहे.

त्यांची कायदेशीर बाजू मांडताना वकील असीम सरोदे यांनी म्हटलंय की, किरण माने यानिमित्तान एक निमित्त आहेत. त्यांना काढून टाकल्यावर गाजावाजा झाल्यावर कव्हर अप करण्यासाठी त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना 13 तारीख असलेली नोटीस 21 तारखेला देण्यात आली आहे. ज्या दिवशी ते रात्र आणि दिवस शूट करत होते. हा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. पॅनोरमा एंटरटेनमेंट ही एजन्सी आता कायदेशीररित्या अडकली आहे. किरण मानेंची बदनामी, त्यांचा अपमान, आणि स्त्रियांप्रती चुकीचं वागल्याची त्यांची एक चुकीची प्रतिक्रिया निर्माण करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास झाला आहे. यासाठी आता पॅनोरमा कंपनीने त्यांना पाच कोटींची नुकसान भरपाई द्यावी, लेखी पद्धतीने माफी मागावी, त्यांना पुन्हा सन्मानाने काम करण्यासाठी आमंत्रित केलं पाहिजे तरच हे प्रकरण मिटेल अन्यथा पुढची न्यायालयीन कार्यपद्धती अवंलबू. अपारदर्शक कार्यपद्धती बंद झाली पाहिजे, ही मागणी केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

राजकीय भूमिका घेतल्याने सिने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) या चॅनेलवरील 'मुलगी झाली हो' या सिरियलमधून काढून टाकण्यात आल्याची घटना घडली होती. सातारा येथील कलाकार किरण माने हे एका वाहिनीवरील मालिकेत काम करत होते. मध्‍यंतरीच्‍या काळात दिल्‍ली येथील शेतकरी आंदोलन व इतर अनेक राजकीय बाबींच्‍या अनुषंगाने माने यांनी सोशल मीडियातून बेधडक प्रतिक्रिया देणे सुरू केले होते. माने यांच्‍या या कृतीमुळे त्‍यांना काही विशिष्‍ट विचारसरणीच्‍या व्‍यक्‍तींनी ट्रोल करणे सुरू केले होते. हा प्रकार सुरू असतानाच माने यांना अचानकपणे मालिकेतून काढून टाकण्‍यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT