Papa Meri Jaan New song from Animal ranbir kapoor anil kapoor rashmika mandanna SAKAL
मनोरंजन

Animal Papa Meri Jaan: "कठोर तरीही हळवा", बाप - लेकाचं नातं घट्ट करणारं 'अ‍ॅनिमल'चं नवं गाणं आणेल डोळ्यात पाणी!

रणबीर कपूर - अनिल कपूर यांची भन्नाट केमिस्ट्री या गाण्यात बघायला मिळतेय

Devendra Jadhav

Animal Papa Meri Jaan: सध्या रणबीर कपूरच्या आगामी अ‍ॅनिमल सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाचा टीझर सर्वांना आवडला. रणबीर या सिनेमात आजवर कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे.

अ‍ॅनिमलची नवीन गाणी भेटीला येत आहेत. आज अ‍ॅनिमलचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. बाप - लेकाच्या हळव्या नात्याचं चित्रण या गाण्यात असलेलं दिसून येतं.

अ‍ॅनिमलच्या नवीन गाण्याचं नाव आहे "पापा मेरी जान". या गाण्यात रणबीर आणि अनिल कपूर यांच्यातले भावनिक संबंध पाहायला मिळतात.

लोकप्रिय गायक सोनू निगमने हे मनमोहक गाणे गायलंय. वडील - मुलाच्या नात्याचे नाजुक बंध या गाण्यातुन उलगडतात. "पापा मेरी जान" हे गाणे हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही रिलीज झाले आहे

अ‍ॅनिमलमधील "हुआ मैं" आणि "सतरंगा" ही दोन गाणी याआधी रिलीज झाली. या दोन गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आज रिलीज झालेलं अ‍ॅनिमलमधील पापा मेरी जान या सोनू निगमच्या आवाजातील गाण्याला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला अ‍ॅनिमल सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे. सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT