Paparazzi forgot the slippers, Alia bhatt picked up the slippers with her own hands... the video went viral  SAKAL
मनोरंजन

Alia Bhat Video: पापाराझी चप्पल विसरला, आलियाने स्वतःच्या हाताने चप्पल उचलून... अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

आलिया थेट पापाराझीची चप्पल उचलताना दिसतेय.

Devendra Jadhav

Alia Bhat Viral Video News: आलिया भट लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात झळकणार आहे. आलीयाच्या या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अशातच आलियाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.

या व्हिडीओत आलिया थेट पापाराझीची चप्पल उचलताना दिसतेय. आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. बघुया काय घडलंय?

(Paparazzi forgot the slippers, Alia bhatt picked up the slippers with her own hands... the video went viral )

व्यस्त वेळापत्रकात, आलिया गुरुवारी रात्री तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत मुंबई शहरात दिसली. पण यादरम्यान असे काही घडले, ज्याने सर्वांचीच मनं जिंकली.

गुरुवारी आलिया भट्ट एका पापाराझीला मदत करताना दिसली जो तिचे फोटो क्लिक करत होता. फोटो क्लिक करताना त्याची चप्पल पायातुन पडली.

आलियाला जेव्हा हे लक्षात आले तिने स्वतः त्याची चप्पल उचलली आणि त्याला घालायला दिली. आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हि़डीओने तिच्या फॅन्सचं मन जिंकलं आहे.

वायरल भयानीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, 'आलिया भट्ट म्हणाली - ही चप्पल कोणाची आहे?' सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली,

त्यापैकी एकाने लिहिले की, "ही चप्पल कायमची फ्रेम केली जाईल." दुसरा म्हणाला, 'ती खूप गोड आणि विनम्र आहे, दुसरी कोणती अभिनेत्री असती तर तिने असे केले नसते, त्यामुळे आलिया माझी आवडती आहे.' तिसरा म्हणाला, 'खूप गोड."

आलीयाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर.. आलिया आता करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या वर्षी २८ एप्रिलला रिलीज होणार होता. पण या सिनेमाची पहिली झलक आज भेटीला आली असुन रणवीर - आलियाचा रॉकींग अंदाज पहायला मिळतोय.

सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली असुन 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT